Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : आर वेंकटरामनी भारताचे नवे अ‍ॅटर्नी जनरल

Spread the love

नवी दिल्ली : माझे वाढते वय पाहता आगामी काळात ही जबाबदारी पार पडणे मला शक्य होणार नाही, असे वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारला कळवले होते. त्यानंतर केंद्र सरकारने आर वेंकटरामनी यांची अ‍ॅटर्नी जनरलपदी नियुक्ती केली आहे. ज्येष्ठ वकील आर वेंकटरामनी यांची तीन वर्षांसाठी भारताचे नवे अ‍ॅटर्नी जनरल (महान्यायवादी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


विद्यमान अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील. कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्या कार्यालयाने ट्वीट करत याबाबत अधिक माहिती दिली आहे. आर वेंकटरामनी यांना अ‍ॅटर्नी जनरल म्हणून नियुक्त करताना राष्ट्रतींना आनंद होत आहे. १ ऑक्टोबर २०२२ पासून ते आपला पदभार स्वीकारतील, असे या ट्वीटमध्ये रिजिजू यांच्या कार्यालयाने म्हटले आहे. विद्यमान अ‍ॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल हे ९१ वर्षांचे असून त्यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर रोजी संपणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!