Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SivsenaNewsUpdate : शिवतीर्थावर अखेर आवाज शिवसेनेचाच !! शिंदे गटाची याचिका फेटाळली…

Spread the love

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका फेटाळू लावत , शुक्रवारी शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे दादरच्या शिवाजीपार्कवर पुन्हा एकदा आवाज शिवसेनेचाच घुमणार हे नक्की झाले आहे.


गेल्या काही दिवसांपासून या विषयावरून महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात मोठे वादळ निर्माण झाले होते. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिवसेनेत उत्साह निर्माण झाला आहे. कालच मुंबई महापालिकेने शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांनाही शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी नाकारली होती. त्याआधीच शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर शुक्रवारी उच्च न्यायालयात जवळपास साडेतीन तास युक्तिवाद करण्यात आला. शिवसेना, पालिका आणि शिंदे गटाच्या वकिलांकडून आपापली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाने पालिकेचा निर्णय योग्य, उचित नाही असा शेरा मारत ठाकरेंना शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला परवानगी दिली आहे. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याची हमी ठाकरेंच्या वकिलांनी न्यायालयात दिली.

सुप्रीम कोर्टात जे काही न्यायालयीन वाद सुरू आहे ते एकप्रकारचे दुष्टचक्र आहे… त्यात बरेच काही बोलण्यासारखे आहे.. पण त्याचा दसरा मेळावा आयोजनाशी संबंध नाही, असं सांगत शिंदे गटाचा हस्तक्षेप अर्ज म्हणजे आमदार सदा सरवणकर यांचा अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला लावला. हा अर्ज फेटाळून लावताना ठाकरे गटाने हस्तक्षेप अर्जावर केलेल्या युक्तिवादाशी आम्ही सहमत असल्याचंही कोर्टाने म्हटले आहे.

दरम्यान शिवसेना पक्ष कोणाचा यात आम्ही जात नाही आहोत. तो वाद सुप्रीम कोर्टात आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर प्रलंबित आहे. त्यात आम्ही जाण्याचे कोणतेही कारण नाही. २०१६पासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावासाठी मुंबई महापालिका परवानगी देत आली आहे. शिवाजी पार्कवरील अनेक कार्यक्रमाबाबत अधिसूचनेद्वारे तरतूद करण्यात आली आहे. एकूण ४५ दिवस आहेत. त्यापैकी ७ दिवस आहेत.

महापालिकेचा युक्तिवाद…

शिवसेनेने पालिकेकडे यंदाच्या आयोजनासाठी अर्ज दिले. त्याला प्रतिसाद नाही म्हणून याचिका आली. त्यावर सुनावणी घेण्याचे ठरवले. त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी दादर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा अभिप्राय पालिकेला दिला. त्या आधारे पालिकेने दोन्ही अर्ज फेटाळले. २१ सप्टेंबरलाच पालिकेने आदेश अर्जदारांना कळवला. २२ ऑगस्ट ते २१ सप्टेंबर या कालावधीत अर्जावर निर्णय का दिला नाही, याचे कोणतेही समाधानकारक उत्तर पालिकेला देता आले नाही. आमच्या मते पालिकेचा निर्णय योग्य, उचित नाही.

दरम्यान शिंदे गट आणि ठाकरे गटाने उच्च न्यायालयात आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा युक्तीवाद केला. न्यायालयाने तुमचा युक्तीवाद मर्यादेत ठेवा असे नमूद करीत सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका फेटाळली आहे. उच्च न्यायालयाने पालिकेला तुम्हाला यापूर्वी असे अर्ज आले होते का? त्यावर त्यावेळी तुम्ही काय निर्णय घेतलात असा सवाल न्यायालयाने केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!