Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BJPNewsUpdate : २०२४ : ४५ वर खासदार आणि २०० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील : चंद्रशेखर बावनकुळे

Spread the love

औरंगाबाद : महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज औरन्गाबाद दौऱ्यावर आहेत. आजच्या आपल्या दौऱ्यात त्यांनी  शिंदे आणि फडणवीस सरकारचे  कौतुक करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देत ते म्हणाले, कोणताही आमदार नाराज नाही केवळ काही  आमदार नाराज असल्याचा प्रोपोगंडा तयार केला जात आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ४५ वर खासदार आणि विधानसभेत २०० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील असा दावाही त्यांनी यावेळी केला.


 दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले कि , ‘मला असं वाटतं की उद्धवजींनी जे मोठे मोठे भाषण केले त्यातून काही होणार नाही, तर शिवसेनेत अजूनच खिंडार पडणार आहे. जुन्या सरकारपेक्षा शिंदे-फडणवीस सरकार कधीही चांगलं आहे. १८ तासापेक्षा जास्त वेळ काम करणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याला मिळाले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक कोपऱ्याचा अभ्यास देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे विकास जलद गतीने होणार’, असं बावनकुळे म्हणाले.

राज ठाकरे यांचे कौतुक

यावेळी बोलताना  बावनकुळे यांनी राज ठाकरे यांचे कौतुक करताना म्हटले कि , राज ठाकरे दिलदार नेता आहे. मैत्रीसाठी ते दिलदार नेता आहेत. शिंदे व फडणवीस सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने काम करत आहे यामुळे विरोधकांना हे जड जात असल्याचे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजप युतीचे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ४५ वर खासदार आणि विधानसभेत २०० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मविआने वैधानिक विकास मंडळे बरखास्त केली. त्यांना मुदतवाढ दिली नाही. उलट १२ आमदारांच्या नियुक्त्यांशी त्यांचा संबंध जोडला. १२ आमदार नियुक्त करा मग विकास मंडळे पुनरुज्जीवित करतो अशी मागास भागांविरोधी भूमिका घेतली अशी टीका बावनकुळे यांनी केली.


भाजप पूर्ण ताकदीने लढणार …

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. याबद्दल बावनकुळे यांनी सांगितले की, केवळ बारामतीच नव्हे तर राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघात भाजपला मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री या मतदारसंघात जाणार आहेत. केंद्राच्या योजना या मतदारसंघातील सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय राज्यातील ९८ विधानसभा क्षेत्रांतही राज्यातील मंत्री जाणार असून त्या जागा पूर्ण ताकदीने लढण्याचा भाजप प्रयत्न करणार आहे.

दरम्यान बावनकुळे यांनी यावेळी आवर्जून सांगितले की, राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वच निवडणूक भाजप शिंदे गटासोबतच लढणार आहे. याबद्दल कुणीही शंका घेण्याचे कारण नाही. मविआचे काय होईल, हे सांगता येत नाही. राज्यातील एकूण ६०८ ग्रामपंचायतींमधून भाजप व शिंदे गटाचे जवळपास ३३५ सरपंच निवडून आले, असा दावाही चंद्रशेखर बावनकुळेंनी केला. बावनकुळे म्हणाले, भाजपचे २९४ सरपंच निवडून आले आहेत. हे सरपंच भाजपच्या कोणत्या पदावर होते, याची माहिती माझ्याकडे आहे. तसेच, शिंदे गटाचे ४१ सरपंच निवडून आले आहेत. यातून जनता मागच्या सरकारच्या कंटाळली होती, हेच दिसून आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!