Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : ‘वेदांत’ ‘फॉक्सकॉन’ वरून उद्धव ठाकरे यांनी काढली सरकारची लाज …

Spread the love

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २० अब्ज डॉलर्सच्या ‘वेदांत’ डील प्रकरणात भाजप आणि टीम एकनाथ शिंदे वारंवार खोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे. राज्यात सत्तेत असलेलेली भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची टीम सातत्याने खोटे बोलत असल्याचे ठाकरे म्हणाले.राजधानी मुंबईतील सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, पण तुम्हीच खोटे बोलत आहात. या उद्योगांना दुसऱ्या राज्यात नेण्याचा प्रयत्न करत आहे. आता वेदांत गेला आहे. किती खोटे बोलाल ? तुम्हाला लाज लाज वाटायला हवी.हवे तर मी तुमच्यासोबत येतो, त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करूया.”

भारतीय समूह ‘वेदांत’ आणि तैवानची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी ‘फॉक्सकॉन’ यांनी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारवर विरोधकांकडून हल्लाबोल होत आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र अनेक दिवसांपासून लॉबिंग करत होता. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले होते की मागील एमव्हीए सरकारने हा प्रकल्प जवळजवळ अंतिम केला होता, परंतु सध्याच्या सरकारने संभाव्य गुंतवणूकदारांचा विश्वास गमावला आहे.

हा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही राज्यातील एकनाथ शिंदे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले की, डबल इंजिनचे सरकार महाराष्ट्रातील जनतेवर मेहरबान आहे. या प्लांटमुळे राज्यातील हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. त्याच्या जाण्याने
येथील जनतेला सर्वाधिक त्रास सहन करावा लागला आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!