Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaCourtNewsUpdate : सरन्यायाधीश उदय लळीत घावताहेत नवा इतिहास, सर्वोच्च न्यायालयाची आता होणार लाईव्ह सुनावणी …

Spread the love

नवी दिल्ली : २७ सप्टेंबर पासून सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठासमोरील खटल्यांची सुनावणी लाईव्ह करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात २७ सप्टेंबरपासून होणार आहे. सुरुवातीला हे लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबवर होणार आहे आणि नंतर सर्वोच्च न्यायालय लाईव्ह स्ट्रिमिंगसाठी स्वतःचा प्लॅटफॉर्म विकसित करणार असल्याचे वृत्त ‘बार अँड बेंच’ने दिले आहे. सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘फूल कोर्ट मीटिंग’मध्ये घेण्यात याबाबत निर्णय घेण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या निवृत्तीवेळी लाईव्ह स्ट्रिमिंग केलं होतं. त्यावेळी ते नॅशनल इन्फॉर्मेटिंक्स सेंटर या सरकारी संस्थेच्या संकेतस्थळावर दाखवण्यात आलं होतं. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश उदय लळित यांनी पदभार स्वीकारल्यानंतर न्यायालयातील पेंडीग प्रकरणं निकाली काढण्याचे मोठे आव्हानात्मक काम स्वीकारले असून त्याची अंमलबजावणी ते करीत आहेत. अवघ्या १३ दिवसांत पाच त्यांच्या काळात त्यांनी पाच हजाराहून अधिक प्रलंबित खटले निकाली काढले आहेत.

यासंदर्भात ‘बार अ‍ॅंण्ड बेंच’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने गेल्या १३ दिवसांत एकूण ५११३ प्रकरणं निकाली काढली आहेत. यामध्ये २८३ नियमित, १२१२ हस्तांतरण केलेल्या तर ३६१८ अन्य प्रकरणांचा समावेश आहे. ही प्रकरणं निकाली काढण्यासाठी नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश उदय लळित या पदभार स्वीकारल्यानंतर न्यायप्रक्रियेत जे बदल केलेत त्यापैकी हा एक महत्वाचा बदल मनाला जात आहे.तसेच सर्वोच्च न्यायालयात कामांच्या दिवशी नियमीत प्रकरणाच्या सुनावणी दुपारी १०.३० ते १ दरम्यान घेण्यात येत आहेत. तर अन्य दिवशी दुपारी २ ते ४ या वेळात इतर प्रकरणांच्या सुनावणी घेण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!