Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HingoliNewsUpdate : हिंगोलीत २७ व्या नांदेड परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

Spread the love

हिंगोली / प्रभाकर नांगरे : हिंगोली जिल्हा पोलीस दलाकडुन करण्यात आले असुन सदर स्पर्धा आज दिनांक २० / ० ९ / २०२२ सुरू होवुन दिनांक २३ / ० ९ / २०२२ रोजी स्पर्धेचा समारोप समारंभ होणार आहे . सदर स्पर्धेत १ ) हिंगोली २ ) नांदेड , ३ ) लातुर , ४ ) परभणी या ०४ जिल्हयातील ५१२ पोलीस अधिकारी व अंमलदार ( पुरूष व महिला ) सहभागी झाले आहेत . किडा मधील सर्व प्रकारात ज्यात व्ययक्तीक ॲथेलेटीक मधील सर्व स्पर्धा , कुस्ती , बॉक्सींग , ज्युदो , स्विमींग , त्वायक्वांदो तसेच सांघीक मध्ये कब्बड्डी , खो – खो , हॉकी , फुटबॉल , हॅडबॉल , व्हॉलीबॉल इत्यादी स्पर्धा होणार आहेत .


सदर स्पर्धा एकुण ०७ मैदानावर ज्यात संत नामदेव पोलीस कवायत मैदान , रा . रा.पो. बल गट क .१२ येथील किडा मैदान , नवीन पोलीस वसाहत मैदान , आदर्श कॉलेज क्रिडा मैदान , जिल्हा किडा संकुल , हिंगोली व परभणी येथे खेळवीले जाणार आहेत . सदर स्पर्धा यशस्वी करीता जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांचे विवीध जबाबदारी असलेले २० समित्या स्थापन केलेले असुन प्रत्येक स्पर्धेकरीता तज्ञ व अनुभवी पंचांची नेमणुक सुध्दा करण्यात आली आहे .

सदर स्पर्धेचा समारोप समारंभ दि . २३ / ० ९ / २०२२ रोजी संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे निसार तांबोली पोलीस उप महानिरीक्षक , नांदेड परिक्षेत्र , नांदेड यांच्या प्रमुख उपस्थीतीत संपन्न होणार असून सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी हिंगोली  जितेंद्र पापळकर ,   मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद , हिंगोली ,  संजय दैने , रा.रा.पो.बल गट क्र . १२ हिंगोलीचे समादेशक  संदिपसिंह गिल , तसेच नांदेड , परभणी व लातुर येथील पोलीस अधीक्षक व इतर मान्यवर अतिथी उपस्थीत राहणार आहेत .

स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्रे , मेडल्स् , ट्रॉफी इत्यादी पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे . आज रोजी मा.पोलीस अधीक्षक एम . राकेश कलासागर व रा . रा . पो . बल गट क . १२ हिंगोलीचे समादेशक  संदिपसिंह गिल , अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे , सहायक पोलीस अधीक्षक श्री यतीश देशमुख , जिल्हा किडा अधिकारी श्री संजय मुंढे , पोलीस निरीक्षक श्री सोनाजी आम्ले ,  वैजनाथ मुंडे ,  उदय खंडेराय यांचे उपस्थीतीत संत नामदेव पोलीस परेड ग्राऊंडवर भव्य असे अॅडव्हरटाईज बलुन हवेत सोडुन व रा . रा . पो . बल गट क . १२ किडी मैदान हिंगोली येथे स्पर्धेचे औपचारीक उद्घाटन होवुन सुरूवातील महीला पोलीसांचे कब्बड्डी चे सामने खेळवुन स्पर्धेला B जनसंपर्क अधिकारी सुरूवात करण्यात आली आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!