Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraEducationNewsUpdate : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाची महत्वाची सूचना …

Spread the love

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुढच्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.


मंडळाने जाहीर केलेल्या तारखेनुसार बारावीची परिक्षा 21 फेब्रुवारीला, तर दहावीची परीक्षा 2 मार्चला सुरू होणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आपल्या ‘www.mahahsscboard.in‘ या अधिकृत संकेतस्थळावर हे वेळापत्रक जाहीर केले आहे.

विद्यार्थ्यांना परिक्षेच्या तारखेबाबत कल्पना यावी, त्यादिशेने त्यांनी नियोजन करुन अभ्यासाचे नियोजन करावे, तसेच आपल्या मनावरील ताण कमी करावा, या दृष्टीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तर या वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात, असेही राज्य मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.

बोर्डाच्या वतीने सांगण्यात आले आहे कि , सध्या हे संभाव्य वेळापत्रक फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि महाविद्यालयांना कळविण्यात येईल, असेही राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, यावर्षी राज्यात बोर्डाच्या परीक्षा या दरवर्षीच्या तुलनेत उशिरा घेण्यात आल्यात. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या साधारतः नेहमीपेक्षा काही दिवस उशिरा सुरु झाल्या होत्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!