Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

InformationUpdate : केंद्रीय आरोग्य विभागाकडून २६ औषधांवर बंदी, जाणून घ्या औषधांची नावे …

Spread the love

नवी दिल्ली  : आरोग्य मंत्रालयाने झेन्टॅक, रॅन्टॅक यांच्यासह एकूण २६ औषधांना अत्यावश्यक औषधांच्या यादीतून वगळले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी अत्यावश्यक औषधांची एक यादी जारी केली आहे. या यादीमध्ये एकूण २६ औषधांचा समावेश नाही. यामध्येच Ranitidine या औषधाचाही समावेश आहे. Ranitidine हे औषध भारतात Aciloc, Zinetac आणि Rantac या नावांखाली विकले जाते. आम्लपित्त आणि पोटदुखीशी संबंधित समस्यांवर उपचार म्हणून हे औषध दिले जाते. मात्र आता अमेरिकेपाठोपाठ भारताने या औषधाला अत्यावश्यक औषधांच्या यादीतून वगळले आहे.


या औषधांमुळे कॅन्सर होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यांनतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एम्स तसेच डीजीसीआयशी या औषधाविषयी अधिक चर्चा केली. त्यानंतर हे औषध अत्यावश्यक औषधांच्या यादीतून काढून टाकण्यात आले. दुसरीकडे केंद्र सरकारने अत्यावश्यक औषधांची यादी जाहीर केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या अन्य काही औषधांची किंमत कमी होण्याची शक्यता आहे. यामध्ये मधुमेहावर उपचार करण्यासाठी लागणारी औषधे, इन्सुलिन ग्लेर्जिन, डेलामॅनिड सारखी क्षयरोगविरोधी औषधे तसेच आयव्हरमेक्टिन यांच्यासारख्या अॅन्टीपॅरासाईट औषधांचा समावेश आहे.

देशात सर्वत्र छातीतील जळजळ किंवा ॲसिडिटी या सर्रास जाणवणाऱ्या शारीरिक त्रासावर झेन्टॅक हे औषध घेतले जाते. या औषधामुळे अन्ननलिकेचा कर्करोग झाल्याचा आरोप करत अमेरिकन ग्राहकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र उत्पादक कंपन्यांनी पाच लाख अमेरिकन डॉलरची रक्कम देऊन हे प्रकरण न्यायालयाबाहेरच मिटवण्यात आले होते. दरम्यान, अमेरिकन ‘एफडीए’कडून या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली. भारतातही झेन्टॅकचे स्थानिक झिंटॅक हे औषध उत्पादन कोणत्याही चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) म्हणजेच ‘ओव्हर द काऊंटर’ विकले जाते.

बंद केलेल्या औषधांची यादी …

1. अल्टेप्लेस
2. अॅटेनोलोल
3. ब्लीचिंग पाउडर
4. कॅप्रोमायसीन
5. सेट्रिमाइड
6. क्लोरफेनिरामाइन
7. दिलोक्सॅनाइड फ्यूरोएट
8. डिमेरकाप्रोलो
9. एरिथ्रोमायसीन
10. एथिनील एस्ट्राडीयोल
11. एथिनिल एस्ट्राडियोल (ए) नोरेथिस्टरोन (बी)
12. गॅनिक्लोवीर
13. कनामायसीन
14. लॅमिवुडिन (ए) + नेविरापीन (बी) + स्टावूडीन (सी)
15. लेफ्लुनोमाइड
16. मेथिल्डोपा
17. निकोटिनामाइड
18. पेगीलेटेड इंटरफेरॉन अल्फा 2ए, पेगीलेटेड इंटरफेरॉन अल्फा 2बी
19. पेंटामिडाइन
20. प्रिलोकेन (ए) + लिग्नोकेन (बी)
21. प्रोकार्बाजिन
22. रॅनिटिडीन
23. रिफाब्यूटिन
24. स्टावूडीन (ए) + लॅमिवुडीन (बी)
25. सुक्रालफेट
26. पेट्रोलेटम

आपलं सरकार

Click to listen highlighted text!