Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraNewsUpdate : बौद्ध भिक्खू भन्ते अश्वजित यांचे निधन

Spread the love

भुसावळ :  बौद्ध भिक्खू भन्ते अश्वजित यांचे निधन झाले असल्याचे वृत्त आहे . भन्ते अश्वजीत हे भुसावळ येथे वर्षावास साठी गेले होते, तेथे त्यांना हृदय विकार चा झटका आला होता, अँजिओप्लास्टी केली,चेक केले असता ३ ब्लॉक आढळून आले, त्यावर उपचार केले, तब्येत बरी होऊन विहारात गेले होते, परत तीन दिवसांनी तब्येत बिघडली आणि परत हॉस्पिटलमध्ये दाखल  केले परंतु उपचार चालू असतानाच १०.४० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.


भन्ते अश्वजित सातत्याने विविध दैनिकासह , साप्ताहिक, मासिकांमधून लिखाण करत होते, धम्मावर त्यांचे अनेक लेख प्रकाशित आहेत, त्यांची दोन पुस्तक प्रकाशित आहेत,1) चरथ भिक्खवे चारीक,2)धम्म सागरातील शंखशिंपले, ही दोन्ही पुस्तक रमाई प्रकाशन, औरंगाबाद ने प्रकाशित केली होती. गेल्या दोन महिन्या पूर्वीच औरंगाबादला त्यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला होता. भन्ते अश्वजित यांची ओळख म्हणजे ते फळ्यावर लिहून धम्म समजावत असत तसेच उपसकांवर संस्कार करीत असत. शिवाय प्रश्न – उत्तराच्या माध्यमातून ते आपले प्रवचन देत असत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी ३२ गावे,  शहर इत्यादी ठिकाणी राहून त्यांनी कार्यशाळा घेतल्या. त्यांच्या पार्थिवावर बुध्द भूमि शिर्ला, अकोला येथे दिनांक १२ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!