Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : ब्रिटनच्या महाराणीला ९६ तोफांची सलामी , राणीच्या जाण्याने लंडनमध्ये होताहेत मोठे बदल …

Spread the love

लंडन : ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना शुक्रवारी मध्य लंडनमधून ९६ तोफांची सलामी देण्यात आली. राणीचा मुलगा, सम्राट चार्ल्स तिसरा आणि त्याची पत्नी कॅमिला बालमोरल येथे रात्रभर मुक्काम केल्यानंतर आज लंडनला रवाना झाले. आज शुक्रवार हा राष्ट्रीय शोकाचा पहिला दिवस होता. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे गुरुवारी राणीचे निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या.


बकिंघम पॅलेसने राणीच्या आयुष्यातील प्रत्येक वर्षाचा सन्मान करण्यासाठी  ‘स्काय न्यूज’च्या वृत्तानुसार, शुक्रवारी हायड पार्क आणि टॉवर ऑफ लंडन येथून बंदुकीची सलामी देण्यात आली. “राणीच्या आयुष्यातील प्रत्येक वर्षासाठी बंदुकीची सलामी दिली जाईल,” असे एका निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, टपाल सेवेने पुष्टी केली आहे की त्यांचे चित्र असलेली  पोस्टाची तिकिटे त्यांच्या  मृत्यूनंतरही वैध राहतील.

राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर होणार अनेक बदल…

ब्रिटनमध्ये (यूके) काल गुरुवारी दुपारी राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन होताच ही बातमी आगीसारखी जगभर पसरली.७० वर्षे राज्य केल्यानंतर राणीच्या निधनाने ब्रिटनमध्ये एक युग संपले आहे.  ब्रिटनमधील फ्रीलान्स पत्रकार शिखा वार्शने यांनी एनडीटीव्हीशी बोलताना राणी एलिझाबेथच्या मृत्यूनंतर लंडनमध्ये काय बदल होतील असे विचारले असता त्या म्हणाल्या कि ,  “राणीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी, सर्वांचे अंतःकरण जड झाले आहे. राणीच्या मृत्यूनंतर काल संध्याकाळी पाऊस असूनही, हजारो लोक बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर जमले आणि राणीच्या अंत्यदर्शनासाठी सेंट्रल लंडनला गेले.” रस्त्यावर ठिकठिकाणी लोक श्रद्धांजली वाहण्यासाठी फुलांची व्यवस्था करत आहेत.

राणी एलिझाबेथ यांनी  आपल्या आयुष्यातील ७० मौल्यवान वर्षे या देशासाठी दिली आणि त्यांनी आपले कर्तव्य चोख बजावले, असे ब्रिटनमधील जवळपास सर्वांचेच मत आहे. लोकांनी त्याच्यावर खूप प्रेम केले. शिखा यांनी पुढे म्हटले आहे कि , “लंडनमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे आणि हलका पाऊस पडत आहे जणू आकाशही राणीला श्रद्धांजली वाहताना दिसत आहे.”

लंडनमध्ये १० दिवसांचा शोक …

लंडनमध्ये १० दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला असून, १९ सप्टेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राणीला त्यांच्या  आयुष्यातील प्रत्येक वर्षासाठी ९६ तोफांची सलामी देखील देण्यात आली. येथे शाळा-कॉलेज आणि कार्यालयांचे काम सामान्य पद्धतीने सुरू आहेत. दरम्यान ज्या दिवशी राणीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होईल, त्याच  दिवशी येथे एक दिवस राष्ट्रीय सुट्टी असेल.”

दरम्यान राणी एलिझाबेथनंतर ब्रिटनमध्ये काय बदल होणार या प्रश्नाला उत्तर देताना शिखा यांनी म्हटले आहे कि ,  “ब्रिटनचा इतिहास बदलेल. त्यांनी महायुद्धाबरोबरच आपल्या साम्राज्याचा अंत पाहिला. ब्रिटनमध्ये सर्वत्र राणीची छाप होती पण आता  त्यांच्या खुणा काढून सर्वत्र चार्ल्स यांचे नाव दिले जाईल.

राष्ट्रगीतातही होईल बदल …

त्यांनी पुढे सांगितले की, ब्रिटनमध्ये राणीच्या नावाने पासपोर्ट जारी केले जातात. ते बदलले जातील. राष्ट्रगीतामध्ये ‘लाँग लिव्ह क्वीन’ ऐवजी ‘लाँग लिव्ह किंग ’ गायले जाईल. पोलीस आणि लष्कराच्या गणवेशावरूनही  राणीचा ठसा बदलला जाईल. चलनी नोटांमधून राणीची छबी बदलली जाणार आहे. टपाल तिकिटांवर असलेला राणीचा ठसाही  बदलला जाईल. दरम्यान राणीच्या मृत्यूनंतर राजघराण्याची अधिकृत वेबसाइट काही काळ बंद करण्यात आली होती. ती अपडेट केले जात होती. आता ती राणीऐवजी राजाच्या नावाने ओळखली जाणार आहे. काही गोष्टी ताबडतोब बदलल्या असून काही गोष्टी बदलायला वेळ लागेल.

ब्रिटनच्या राजेशाहीत काय बदल होणार?

राणीच्या मृत्यूनंतर ब्रिटनच्या राजेशाहीतही  काही महत्त्वाचे बदल होऊ शकतात. लोकांच्या मनात अजूनही राणीची छाप होती, पण आता त्यांच्या जागी राजाचा स्वीकार करावा लागेल. राणीची प्रतिमा सर्वांना तितकीच मान्य होती. ती सर्वांची प्रिय आणि दयाळू होती. त्यांच्यात  अद्भुत व्यक्तिमत्वाची झलक  होती. लोकांना त्या खूप जिव्हाळ्याने भेटायच्या.

शिखा वार्ष्णेय सांगतात, “राणी आणि चार्ल्स यांच्या व्यक्तिमत्त्वात खूप फरक आहे. दोघेही एकमेकांपासून खूप वेगळे होते. आत्तापर्यंत सर्व काम परंपरेप्रमाणे केले जात आहे. पण आता राजा चार्ल्स तिसरे यांच्याकडे राजेपद आल्यानंतर ब्रिटनच्या राजेशाहीत काही बदल होतात का ? हे पाहणे मनोरंजक आहे. ही परंपरा किती काळ टिकेल हे माहीत नाही पण लोकांना काही बदल अपेक्षित आहेत.”

काही महिन्यांपूर्वीच राणीच्या सत्तेला ७० वर्षे पूर्ण झाल्याचा सोहळा साजरा करण्यात आला. बदलत्या काळात ही राजेशाही किती काळ टिकेल, हे या काळात राणीच्या मनात कुठेतरी होते पण  येणारा काळच हे स्पष्ट करेल. शिखा म्हणते, “येथे वातावरण उदास आहे पण बदल अपेक्षित आहे.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!