Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BJPNewsUpdate : मिशन २०२४ : भाजपकडून १५ राज्यातील प्रभारी जाहीर , महाराष्ट्रातील ४ नेत्यांचा समावेश …

Spread the love

नवी दिल्ली : विरोधी पक्षाकडून भाजपला शह देण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, एनडीएशी नुकतीच फारकत घेतलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार , तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी मशाल हाती घेतलेली असताना आणि इतर विरोधक बेसावध असतानाच भारतीय जनता पक्षाने (भाजप) १५ राज्यांमध्ये प्रभारी आणि सहप्रभारींची नेमणूक करण्यात आल्याची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील  विनोद तावडे , प्रकाश जावडेकर, पंकजा मुंडे  आणि माजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा समावेश आहे . भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून हि माहिती देण्यात आली आहे.


याशिवाय भाजपनेते ओम माथूर, बिप्लब कुमार देब , लक्ष्मीकांत वाजपेयी , राधामोहन अग्रवाल, पी मुरलीधर राव , विजय रुपाणी , अरुण चतुंग , लक्ष्मीकांत वाजपेयी सिंह , महेश शर्मा , मंगल पांडे आणि संबित पात्रा यांचाही या यादीत समावेश आहे.

अशी आहे जबाबदारी …

विशेष म्हणजे केंद्रातून आणि विविध राज्यातून मंत्रिपदावरून किंवा इतर महत्वाच्या पदांवरून काढण्यात आलेल्या नेत्यांवर खासकरून हि जबाबदारी टाकण्यात आली आहे. हि जबाबदारी पुढील प्रमाणे

  • बिहार- विनोद तावडे (प्रभारी), हरीश द्विवेदी (सहप्रभारी)
  • छत्तीसगढ- ओम माथूर (प्रभारी), नितीन नवीन (सहप्रभारी)
  • दादरा-नगर हवेली आणि दीव-दमण- विनादे सोनकर (प्रभारी)
  • हरियाणा- बिप्लब कुमार देव
  • झारखंड- लक्ष्मीकांत वाजपेयी
  • केरळ- प्रकाश जावडेकर
  • लक्षद्वीप- राधामोहन अग्रवाल
  • मध्य प्रदेश- मुरलीधर राव, पंकजा मुंडे (सहप्रभारी), रमाशंकर कठोरिया (सहप्रभारी)
  • पंजाब- विजय रुपाणी (प्रभारी), नरिंदर रैना (सहप्रभारी)
  • तेलंगणा- तरुण चुघ (प्रभारी), अरविंद मेनन (सहप्रभारी)
  • चंदीगढ- विजय रुपाणी (प्रभारी)
  • राजस्थान- अरूण सिंह (प्रभारी), विजया राहटकर (सहप्रभारी)
  • त्रिपुरा- महेश शर्मा
  • पश्चिम बंगाल- मंगल पाण्डेय (प्रभारी), अमित मालवीय (सहप्रभारी), आशा लकडा (सहप्रभारी)
  • ईशान्य भारत प्रदेश- सांबित पात्रा (प्रभारी), रितुराज सिन्हा (सहप्रभारी)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!