Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndianCricketUpdate : आयपीएलच्या बाबतीत सुरेश रैनाने घेतला मोठा निर्णय

Spread the love

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या सुरेश रैनाने आता देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलपासूनही दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. रैनाने स्वतःच ट्विट करून ही माहिती दिली आहे. म्हणजेच रैना आता आयपीएल खेळताना दिसणार नाही. रैनाने आपल्या ट्विटमध्ये चाहत्यांचे नेहमीच समर्थन केल्याबद्दल आभार मानले आहेत.


रैनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘आपल्या देशाचे आणि यूपी राज्याचे प्रतिनिधित्व करणे हा अत्यंत सन्मान आहे. मला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करायची आहे. मला @BCCI, @UPCACricket, @ChennaiIPL, @शुक्लाराजीव सर आणि माझ्या सर्व चाहत्यांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आणि माझ्या क्षमतेवर असलेल्या अतूट विश्वासाबद्दल आभार मानायचे आहेत.

१५ ऑगस्ट २०२० रोजी धोनीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या रैनाने आता देशांतर्गत क्रिकेटपासूनही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. रैना देश-विदेशात क्रिकेट लीग खेळत असला तरी यंदा रैना वर्ल्ड रोड सेफ्टी सीरिजमध्येही खेळणार आहे.

आपल्या आयपीएल कारकिर्दीत रैनाने २०५ सामने खेळले आणि यादरम्यान त्याने ५५२८ धावा काढल्या. रैना आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळायचा. पण यावेळी त्याला सीएसकेने लिलावात विकत घेतले नाही. दरम्यान आता रैना रोड वर्ल्ड सेफ्टी सीरीज व्यतिरिक्त जगातील दुसऱ्या क्रिकेट लीगमध्ये भाग घेताना दिसणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!