Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : कर्जविषयक ‘अ‍ॅप्स’च्या जाळ्यात ओढून कर्जदारांच्या आर्थिक आणि मानसिक छळ , ईडीकडून चौकशी …

Spread the love

नवी दिल्ली : आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांना कर्जविषयक अ‍ॅप्सच्या जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक आणि मानसिक छळवणूक करण्यात येत असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून हे सर्व चिनी अ‍ॅप्स असून सध्या सक्तवसुली संचालनालयाकडून त्याची चौकशी केली जात आहे.


याबाबतच्या वृत्तानुसार या अ‍ॅप्सची ईडीकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणांशी संबंधित अनेक ठिकाणांवर ईडीकडून छापेमारी देखील करण्यात आली आहे. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये ‘रॅझॉरपे’, ‘पेटीएम’ आणि ‘कॅशफ्री’ या अ‍ॅप्सशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. चिनी लोकांचे नियंत्रण असलेल्या या अ‍ॅप्सद्वारे घेतलेल्या कर्जामध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय ईडीला आहे. याप्रकरणी विविध ठिकाणांवर ईडीकडून शोधमोहिम राबवली जात आहे. काही चिनी व्यक्तींकडून या प्रकरणात ईडीने तब्बल १७ कोटी जप्त केले आहेत.

चिनी अ‍ॅप कर्ज प्रकरण काय आहे?

याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पावसाळी अधिवेशनात माहिती दिली होती. देशात कोरोनाच्या  काळात अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. यातून मार्ग काढण्यासाठी अनेकांनी या अ‍ॅप्सद्वारे कर्ज घेतले. कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून अ‍ॅप्सकडून आर्थिक आणि मानसिक छळ झाल्याने अनेकांनी आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आल्यानंतर यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. हे अ‍ॅप्स डाऊनलोड करताना या अ‍ॅप्सने कर्जदारांची वैयक्तिक माहिती चोरल्याचा आरोप होत आहे.


या अ‍ॅप्सद्वारे कर्ज घेतलेल्यांना व्याजासाठी मोठी रक्कम आकारण्यात येत होती. वैयक्तिक माहिती वापरून या कर्जदारांना या अ‍ॅप्सकडून धमकावण्याचा प्रकार होत असल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी मनी लॉड्रिंग कायद्याअंतर्गत ईडीकडून तपास करण्यात येत आहे. भारतीयांची बनावट कागदपत्रे वापरून त्या व्यक्तींना एका खोट्या कंपनीवर संचालक म्हणून दाखवायचे आणि गुन्हा करायचा, अशी या फसवणूकदारांची पद्धत असल्याचे एका ईडीच्या सूत्राने सांगितले आहे. हा सर्व प्रकार चिनी व्यक्तींकडून नियंत्रित करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे.

देशभरात गुन्हे दाखल …

लोकसत्ता ऑनलाइनच्या वृत्तानुसार अ‍ॅप्सद्वारे आर्थिक फसवणूक झाल्याच्या  देशभरातील पोलीस ठाण्यांमध्ये १८ एफआयआर दाखल आहेत. यामध्ये  ‘रॅझॉरपे’, ‘पेटीएम’ आणि ‘कॅशफ्री’या अ‍ॅप्सच्या कार्यालयीन परिसरात चिनी व्यक्तींचा वावर असल्याचे आढळून आल्यानंतर या ठिकाणांवर पोलिसांनी छापेमारी केली. याप्रकरणी काही जणांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. व्यापारी ओळखपत्र आणि काही बँक खात्यांद्वारे लोकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे.

या अ‍ॅप्सची संकेतस्थळे आणि कार्यालयीन पत्त्यासंदर्भातही काही गैरप्रकार होत असल्याचे ईडीच्या निदर्शनास आले आहे. पेटीएमने या छापेमारीसंदर्भात अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. आम्ही तपास यंत्रणांना सहकार्य करत आहोत असे ‘रॅझॉरपे’ आणि ‘कॅशफ्री’ या अ‍ॅप्सच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!