Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CongresNewsUpdate : भाजप आणि संघावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा हल्ला बोल ….

Spread the love

https://www.youtube.com/watch?v=0UTcf3Njgf8

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, या दोन्ही संघटना जाणीवपूर्वक देशात द्वेष आणि भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. नरेंद्र मोदी सरकारमध्ये भविष्याची भीती, महागाईची भीती आणि बेरोजगारीची भीती वाढत असल्याचा दावाही त्यांनी काँग्रेसच्या ‘महंगाई पर हल्ला बोल’ रॅलीत केला. राहुल गांधी म्हणाले, तुम्ही लोक देशाची स्थिती पाहत आहात. भाजप सरकार आल्यापासून देशात द्वेष आणि संताप वाढत आहे.


त्यांच्या मते, ‘ज्याच्या मनात भीती असते, त्याच्या मनात द्वेष निर्माण होतो. जो घाबरत नाही त्याच्या हृदयात द्वेष उत्पन्न होत नाही. रॅलीपूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “राजा मित्रांच्या कमाईमध्ये व्यस्त आहे, जनता महागाईने त्रस्त आहे. आज लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागतो. या त्रासाला फक्त पंतप्रधानच जबाबदार आहेत. आम्ही महागाई विरोधात आवाज उठवत राहू, राजाला ऐकावे लागेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

भविष्याची भीती, महागाईची भीती आणि बेरोजगारीची भीती देशात वाढत आहे, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे द्वेष वाढत आहे. द्वेषाने लोक विभागले जातात आणि देश कमकुवत होतो. भाजप आणि आरएसएसचे नेते देशाचे विभाजन करून जाणीवपूर्वक देशात भीती आणि द्वेष निर्माण करतात. या भीती आणि द्वेषाचा फायदा कोणाला मिळत आहे? गरीब माणसाला लाभ मिळत आहे का? याचा पुरेपूर फायदा भारतातील दोन उद्योगपती घेत आहेत. बाकी उद्योगपतींना विचारा, तेही सांगतील दोनच जणांना फायदा झाला आहे. या दोन व्यक्तींसोबत सर्व काही हातात हात घालून चालले आहे.

देशातील सर्व यंत्रणा दबावाखाली…

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, देशातील सर्व यंत्रणा दबावाखाली आहेत. विरोधी पक्षांना बोलू दिले  जात नाही. देशाला रोजगार देणाऱ्यांचा कणा भाजपने  मोडला आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मी आता ईडीला घाबरत नाही. मला चौकशीसाठी कितीही वेळा बोलवा, मी घाबरत नाही, असेही ते म्हणाले.

भाजप आणि आरएसएसवर हल्ला बोल ..

राहुल गांधी म्हणाले की, भारतात आज भीती वाढत आहे. आज देशाचं भविष्य भीतीच्या सावटाखाली आहे. लोकांना महागाई आणि बेरोजगारीची भीती आहे. द्वेषाने देश कमकुवत होतोय. भाजप आणि आरएसएसचे नेते देशाचे विभाजन करत आहेत आणि जाणूनबुजून देशात भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत, असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!