Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SupremeCourtNewsUpdate : मोठी बातमी : गुजरात दंगल आणि बाबरी मशीद विध्वंस संबंधित सर्व खटल्यांच्या बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय …

Spread the love

नवी दिल्ली : बाबरी मशीद विध्वंस आणि गुजरात दंगलीशी संबंधित सर्व खटल्यांच्या बाबत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मोठा निर्णय घेतला असून हे सर्व  खटले बंद करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या टिप्पणीनुसार गुजरात दंगलीशी संबंधित हे खटले निष्फळ ठरत असून यापैकी बहुतांश प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाली आहे. तसेच याबरोबरच  ६ डिसेंबर १९९२ रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील बाबरीचा ढाचा पाडण्याशी संबंधित अवमान याचिकाही बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.


दरम्यान न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्ते अस्लम भुरे आता या जगात नाहीत. तसेच 2019 मध्ये झालेल्या निर्णयामुळे आता ही बाब कायम ठेवण्याची गरज नाही. या निर्णयाबरोबरच बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने वकील प्रशांत भूषण आणि पत्रकार तरुण तेजपाल यांच्याविरुद्धची न्यायालयाच्या अवमानाची कारवाईशी संबंधित खटला सुद्धा  बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रशांत भूषण आणि तरुण तेजपाल यांचा खटलाही बंद …

याप्रकरणी दोघांनीही माफी मागितली आहे. २००९ मध्ये एका मुलाखतीत प्रशांत भूषण यांनी माजी आणि विद्यमान न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणी युक्तिवाद करताना कपिल सिब्बल म्हणाले की, प्रशांत भूषण आणि तरुण तेजपाल यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे दोघांविरुद्धचा खटला बंद करण्याची मागणी केली. त्यांची ही मागणी न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने मान्य केली.

न्यायालयाचे बेअदबी केली म्हणून नोव्हेंबर २००९ मध्ये प्रशांत भूषण आणि तरुण तेजपाल यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली होती. यावर प्रशांत भूषण यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, ‘मी २००९ मध्ये तहलकाला दिलेल्या मुलाखतीत कोणत्याही विशिष्ट गोष्टीसाठी भ्रष्टाचार हा शब्द वापरला नव्हता. तसेच हे विधान आपण एका व्यापक संदर्भात व्यक्त केल्याचे म्हटले होते. आर्थिक भ्रष्टाचाराशी त्याचा काहीही संबंध नाही. यामुळे जर कोणी न्यायाधीश किंवा त्यांचे कुटुंब दुखावले गेले असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो. तर, प्रशांत भूषण यांनी ऑगस्ट २०२० मध्ये त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!