Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : चर्चेतली बातमी : रोहित पवार यांनी स्वतःच सांगितले मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीमागचे कारण …

Spread the love

मुंबई : एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली आहे तर दुसरीकडे, रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतल्यामुळे या भेटीवरून अनेक तर्क -वितर्क लावले जात आहेत.


दरम्यान या भेटीची चर्चा तर होणारच हे लक्षात आल्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार यांनी स्वतःच माध्यमांशी बोलताना या भेटीबाबत खुलासा केला कि , त्यांनी विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या हिताचा एक निर्णय मांडला होता. युरोपमध्ये जगदंबाची तलवार आहे, अनेक अशा वस्तू बाहेर आहेत. त्या भारतात कशा आणाव्या, याबद्दल आणि  पोलिसांच्या सुट्टीबद्दल आम्ही चर्चा केली.

पवार कुटुंबियांवर केले जात आहेत आरोप…

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवारांवर विविध प्रकारचे आरोप करत आहेत. त्यांनी अलीकडेच एक ट्वीट करत रोहित पवार यांच्या ‘बारामती अॅग्रो’ कंपनीचा आपण अभ्यास करत असून लवकरच सविस्तर अहवाल सादर करू, असा धमकीवजा इशारा दिला होता. यावरून राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा वाद निर्माण झाला आहे. हे सर्व आरोप -प्रत्यारोप होत असताना हि भेट झाल्याने याची अधिक चर्चा होत आहे.

शरद पवार यांची भाजपवर टीका…

दरम्यान आज एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी  भाजपावर टीका केली आहे. ते म्हणाले कि , रोहित पवार  यांची कोणतीही चौकशी झाली नाही, पण भाजपा नेते त्याआधीच असं होणार, तसं होणार, अशी वक्तव्ये करत आहेत. ते सांगत असतात की, आज यांच्या घरावर धाड पडणार, यांचं अमुक होणार, त्यांचं तमुक होणार आपल्याला कुठूनतरी अधिकृत माहिती मिळाली आहे, असा भास निर्माण करून भाष्य करणारा एक वर्ग महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. पण यांच्याबद्दल लोकं योग्यवेळी निर्णय घेतील” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.

रोहित पवार यांच्याकडून पंतप्रधानांची स्तुती …

विशेष म्हणजे भाजपकडून चर्चित रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आपल्या ट्विटमधून स्तुती केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे कि , “मिलेट्स संदर्भात मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मांडलेली भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आणि दूरदृष्टीची आहे.येणारे वर्ष हे आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष म्हणून साजरे केले जात असून यंदाच्या अर्थसंकल्पांमध्ये केंद्र तसेच राज्य सरकारांनीही भरडधान्य वाढीसाठी विशेष तरतुदी केल्या आहेत.” याला जोडून त्यांनी याबाबतच्या आपल्या काही मागण्याही केंद्राकडे केल्या आहेत. 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!