Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्या. उदय लळीत यांनी घेतली शपथ …

Spread the love

नवी दिल्ली  : भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्या. उदय लळीत यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्यासह इतर मंत्रीदेखील उपस्थित होते. लळीत कुटुंबातील तीन पिढ्यांचे प्रतिनिधीत्व करणारे कुटुंबातील सदस्यही या खास सोहळ्यासाठी आवर्जून होते.


नवे सरन्यायाधीश न्या. उदय लळीत यांचा कार्यकाळ हा तीन महिन्यांपेक्षाही कमी असणार आहे. ते 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. या दरम्यान महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह इतर महत्त्वांच्या प्रकरणांवर निकाल येणार का, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

शपथविधीवेळी कुटुंबातील तीन पिढ्या उपस्थित राहणार आहेत.शपथविधी सोहळ्याला तिचे 90 वर्षीय वडीलही उपस्थित राहणार आहेत. कोर्ट- कचेरी  किंवा वकिली ही या कुटुंबासाठी नवीन गोष्ट नाही. लळीत कुटुंब 102 वर्षांपासून वकिली करत आहे.

न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांचे आजोबा महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात कायद्याचा अभ्यास करायचे. त्यांचे वडील उमेश रंगनाथ ललित, जे आता 90 वर्षांचे आहेत, हे प्रसिद्ध वकील असून ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश राहिले आहेत. न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांच्या पत्नी अमिता लळीत या शिक्षणतज्ज्ञ असून त्या नोएडामध्ये मुलांची शाळा चालवतात.

न्यायमूर्ती ललित यांना श्रीयस आणि हर्षद अशी दोन मुले आहेत. श्रियस हा व्यवसायाने वकील झाला असून तो आयआयटी गुवाहाटीमधून मेकॅनिकल इंजिनीअर आहे आणि त्याची पत्नी रवीनाही वकील आहे तर हर्षद वकील नाही आणि तो त्याची पत्नी राधिकासोबत अमेरिकेत राहतो.

न्या. लळीत यांनी 1983 मध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार काउंसिलमध्ये वकील म्हणून कारकिर्दीत सुरूवात केली होती. 1985 पर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली. त्यानंतर 1986 मध्ये ते दिल्लीत स्थायिक झाले. लळीत जेव्हा  दिल्लीत आले  तेव्हा ते  मयूर विहारमध्ये दोन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहत होता, परंतु त्यानंतर ते  देशातील टॉप क्रिमिनल वकिलांपैकी एक बनले.  टूजी घोटाळा प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयाने त्यांची विशेष पीपी म्हणून नियुक्ती केली होती.

2014 मध्ये त्यांना वकिलावरून थेट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनवण्यात आले. आतापर्यंतच्या इतिहासातील ते दुसरे CJI असतील जे थेट वकीलातून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले आहेत. याआधी 1971 मध्ये देशाचे 13 वे सरन्यायाधीश एस.एम. सिकरी यांनी ही किमया साधली होती. कठोर परिश्रम आणि गुन्हेगारी खटल्यांमधील पकड यामुळे ते आता देशाच्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख बनले आहेत. मात्र, त्यांचा कार्यकाळ केवळ 74 दिवसांचा असेल. CJI म्हणून, न्यायमूर्ती ललित कॉलेजियमचे प्रमुख असतील ज्यात न्यायमूर्ती चंद्रचूड, न्यायमूर्ती कौल, न्यायमूर्ती नझीर आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांचा समावेश असेल.

सरन्याधीशपदाची जबाबदारी स्वीकारणे उदय लळीत हे चौथे मराठी व्यक्ती ठरल्या आहेत. याआधी पी.बी. गजेंद्रगडकर, यशवंत चंद्रचूड आणि शरद बोबडे यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च स्थान भूषवले होते. न्या. लळीत यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1957 रोजी सोलापूरमध्ये झाला. त्यांचे कुटुंबिय मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. न्यायमूर्ती लळीत यांच्या घराण्यात वकिली पिढीजात चालत आलेली आहे. आजोबा, चार काका आणि त्यांचे वडील सर्वजण वकिलीच करायचे. उदय लळीत यांचे आजोबा वकिली करण्यासाठी आपटे येथून सोलापूर येथे जाऊन स्थायिक झाले. त्यांची आजी त्याकाळी भारतात डॉक्टर झालेल्या काही मोजक्या स्त्रियांपैकी एक ‘एलसीपीएस’ डॉक्टर होत्या. त्यामुळे बुद्धिमत्ता, व्यवसाय, चातुर्य आणि अभ्यासवृत्ती रक्तातूनच आलेली. उदय लळीत यांचे वडील अॅड. उमेश लळीत हेही मुंबई उच्च न्यायालयाने नामनिर्देशित केलेले ज्येष्ठ वकील होते. ते 1974 ते 76 या काळात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे माजी अतिरिक्त न्यायाधीश होते. या पार्श्वभूमीवर मुंबईत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!