Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : Entertainment : ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ च्या चित्रीकरणाला थाटात प्रारंभ

Spread the love

मुंबई : गेल्या ४ ते ५ वर्षाच्या संशोधनानंतर ‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि ‘मंत्रा व्हिजन’ निर्मित ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या भव्य ऐतिहासिक सिनेमाच्या चित्रीकरणाला दादासाहेब फाळके , गोरेगाव चित्रनगरीत  थाटात सुरुवात झाली आहे. यावेळी प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर, दिग्दर्शक राहुल जाधव , कथा, संवाद तथा  पटकथा लेखक डॉ. सुधीर निकम,  अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि ताराराणीची भूमिका निभावणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मंत्रा व्हिजनच्या दीपाजी , पुष्कर श्रोत्री , संजय कुलकर्णी , यशवंत देशमुख यांच्यासह अनेक कलावंतांची उपस्थित होती.


औरंगजेबासारख्या स्वराज्यावर टपून बसलेल्या दिल्लीपती बलाढ्य मोगल पातशहाला महाराष्ट्राच्या मातीत कायमचा संपवण्यात स्वराज्यातील स्त्रिया देखील पुरुष योध्यांपेक्षा कमी नाही, हे दाखवून देणाऱ्या आणि मराठ्यांचा देदीप्यमान संग्राम असणाऱ्या भारतीय इतिहासाला पराक्रमाच्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या वीरांगना महाराणी छत्रपती ताराबाई यांच्या कर्तृत्वाची नव्या पिढीला ओळख करून देणारा हा चित्रपट आहे.

या चित्रपटासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी मध्ये भव्य सेट उभारला आहे. संपूर्ण सेटअत्यंत भव्य दिव्या आणि देखणा झाला आहे.  येत्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या “मोगलमर्दीनी महाराणी ताराबाई” या ग्रंथावर आधारीत असून, “मोगलमर्दीनी छत्रपती ताराराणी” या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर कोंडीराम निकम यांचे आहेत आणि राहुल जनार्दन जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर अवधूत गुप्ते यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.

छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा…

चित्रीकरणाच्या निमित्ताने बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव म्हणाले कि, ”छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे आणि म्हणूनच या चित्रपटाद्वारे आपला लखलखीत इतिहास आम्ही प्रेक्षकांच्या समोर आणीत आहोत. प्रेक्षकांना हा अनोखा चित्रपट नक्की आवडेल अशी माझी खात्री आहे.”

मराठी साम्राज्याचा औरंगजेबाच्या मनात पुन्हा दबदबा निर्माण करणाऱ्या छत्रपती ताराराणींची व्यक्तिरेखा मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारत आहे. सोनाली तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “औरंगजेब सारख्या स्वराज्यावर टपून बसलेल्या बलाढ्य मोगल दिल्लीपती पातशहाला महाराष्ट्राच्या मातीत कायमचा झोपवणाऱ्या “मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी” चित्रपटाचा मुहूर्त संपन्न! तुमचे आशिर्वाद आणि शुभेच्छा असू द्या.”

दरम्यान उत्तम कथानकाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन विविध विषयांवरचे दर्जेदार चित्रपट जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी ‘प्लॅनेट मराठी’ कायम अग्रेसर असून अक्षय बर्दापूरकर आणि ‘मंत्रा व्हिजन’ निर्मित आणि राहुल जाधव दिगदर्शित हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील एक महत्वाचा चित्रपट असेल असे कथा, पटकथा आणि संवाद लेखक डॉ. सुधीर निकम यांनी “महानायक ऑनलाईन “शी बोलताना सांगितले.

छत्रपती ताराराणींचा अज्ञात प्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न…

‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाबद्दल ‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”जेव्हापासून हा चित्रपट येतोय अशी घोषणा केली, तेव्हापासूनच तांत्रिक टीमपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनीच या चित्रपटासाठी स्वतःला झोकून दिलं आहे. इतक्या दिवसाचं अभ्यास, वर्कशॉप , प्री वर्क, ही सर्व तयारी केल्यानंतर अखेर हा चित्रपट चित्रीकरणासाठी सज्ज झाला आहे. धाडस आणि शौर्य यांचे असामान्य असं मिश्रण असणाऱ्या छत्रपती ताराराणींचा अज्ञात प्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा हा आमच्या संपूर्ण टीमचा उद्देश आहे.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!