Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BiharNewsUpdate : एकीकडे आज नितीशकुमारांची फ्लोअर टेस्ट आणि दुसरीकडे आरजेडी खासदार , आमदारांच्या घरावर सीबीआयच्या धाडी …

Spread the love

पाटणा : एकीकडे नितीशकुमार यांचे सरकार फ्लोअर टेस्टला सामोरे जात असताना दुसरीकडे सीबीआयने आज सकाळपासून राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) खासदार अशफाक करीम, फयाज अहमद आणि आमदार सुनील सिंग यांच्या घरावर हे छापे टाकण्यात येत आहेत. कथित जमीन-रेल्वे नोकऱ्यांप्रकरणी हे छापे टाकले जात आहेत.


दरम्यान या छापेमारीवर आरजेडी एमएलसी आणि बिस्कोमन पटना अध्यक्ष सिंह यांचे वक्तव्यही आले आहे. ज्यात ते म्हणाले, “हे जाणूनबुजून केले जात आहे. यात काही अर्थ नाही. आमदार आपल्या पक्षात येतील या भीतीने ते हे करत आहेत.” सीबीआयची टीम सकाळी 7.30 वाजल्यापासून सुनील सिंह यांच्या घरी तपासणी करीत आहे.

या धाडींवर आरजेडीचे प्रवक्ते शक्ती सिंह यादव यांनी काल रात्री ट्विट केले होते की,  सीबीआय आणि इतर केंद्रीय एजन्सी छापे टाकण्याच्या तयारीत आहेत कारण भाजप बिहारमधील सत्ता गमावल्याबद्दल “क्रोधीत” आहे. त्यामुळे  नाराज भाजपचे सहकारी सीबीआय, ईडी, आयटी लवकरच बिहारमध्ये छापे टाकण्याच्या तयारीत आहेत.

वास्तविक हा घोटाळा लालू यादव यांच्या यूपीए-1 सरकारमधील रेल्वेमंत्र्यांचा आहे. सीबीआयने 18 मे 2022 रोजी एफआयआर नोंदवला होता. यामध्ये लालू प्रसाद यादव, राबडी देवी, मिसा भारती, हेमा यादव आदींच्या नावांचा समावेश आहे. हा भरती घोटाळा 2004 ते 2009 या कालावधीतील आहे. लालू यादव रेल्वेमंत्री असताना नोकरी मिळण्याऐवजी जमीन आणि भूखंड घेतल्याचे आरोप होत आहेत. या प्रकरणी सीबीआयने लालू यादव यांचे निकटवर्तीय भोला यादव यांना अटक केली होती. 2004 ते 2009 पर्यंत लालू यादव रेल्वे मंत्री असताना भोला यादव हे त्यांचे ओएसडी होते.

जमिनीसाठी नोकरी दिल्याप्रकरणी भोला यादवला अटक करण्यात आली होती. सीबीआयने यावर्षी 17 ठिकाणी छापे टाकले होते. पाटणामधील महत्त्वाच्या मालमत्ता लालूंच्या कुटुंबीयांना रेल्वेत ग्रुप डीच्या नोकरीच्या बदल्यात विकल्या किंवा भेट दिल्याचा आरोप आहे. लालू यादव रेल्वेमंत्री असताना त्यांनी आधी रेल्वेत तात्पुरत्या नियुक्त्या केल्या आणि जमिनीचा व्यवहार होताच त्यांना कायमस्वरूपी नोकरी दिली, असा आरोप आहे. अशा प्रकारे शेकडो लोकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना नोकऱ्या दिल्याचा आरोप लालू यादव यांच्यावर आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!