Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : दहीहंडी फोडताना सातव्या थरावरून पडून जखमी झालेल्या गोविंदाचा मृत्यू

Spread the love

मुंबई  : राज्यातील नागरिक कोरोनाच्या कचाट्यातून मुक्त झाल्यानंतर यंदाचा दही हंडी उत्सव जल्लोषात होणार हे स्पष्ट होते. त्याप्रमाणे संपूर्ण राज्यात गोविदांमध्ये प्रचंड उत्साह होता. विशेष म्हणजे पहिल्यांदाच दहीहंडी प्रकाराला खेळात समावेश करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती तसेच यात सहभागी होणाऱ्या गोविदांना खेळाडू कोट्यातून ५ टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले होते. शिवाय सर्व गोविदांना शासकीय खर्चातून विम्याचे कवच पुरविण्यात येईल असेही शिंदे म्हणाले होते. याच दही हंडीच्या उत्साहात दहीहंडीच्या सातव्या थरावरून कोसळलेल्या गोविंदाचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. संदेश प्रकाश दळवी रा , विलेपार्ले असे या गोविंदाचे नाव आहे.


शिवशंभो गोविंदा पथकाचा हा गोविंदा असून तो २२ वर्षांचा होता. दहीहंडी फोडताना सातव्या थरावरून पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जखमी झाला होता, यानंतर त्याला शिवसेना कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि गेल्या दोन दिवसांपासून त्याच्यावर उपचार चालू होते परंतु त्याच्या मेंदूला इजा झाल्यामुळे तो वाचू शकला नाही.

मृत्यूचे कुणीही भांडवल करू नये : दरेकर

मयत संदेश दळवी ऑटोसिक्षा चालवत होता त्याच्या घरात आई-वडील आणि तीन भावंडं आहेत. मूळचा पार्ल्याचा असलेला संदेश सध्या कुर्ल्याला राहत होता. दरम्यान या गोविंदाच्या मृत्यूचं कुणी राजकारण करू नये, सरकार संवेदनशील असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. सरकारने १० लाखांचं विमा कव्हर पहिल्यांदा दिलं होतं. सरकार या गोविंदाच्या कुटुंबाला सर्व मदत देईल. गोविंदाच्या मृत्यूचं भांडवल म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाताय का? ठाकरे साहेबांची शिवसेना हे चुकीचं करतेय, असं प्रविण दरेकर म्हणाले. दुसरीकडे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही  संदेश दळवीच्या कुटुंबाला मदत केली जाईल, असे  म्हटले आहे.

आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल

याबाबत पोलिसांनी सांगितले की, दहीहंडी आयोजक रियाझ मस्तान शेख यांच्या विरोधात गोविंदांना सुरक्षा उपकरणे न दिल्याबद्दल मुंबईच्या विलेपार्ले पोलिस ठाण्यात शनिवारी संध्याकाळी एक एफआयआर दाखल करण्यात आला होता. या दहीहंडीच्या वेळी संदेश शिवाय विनय शशिकांत रबडे हा गोविंदाही जखमी झाला आहे. संदेश हा विलेपार्ले पूर्वेकडील शिवशंभो गोविंदा पथकात सामील होता. हे पथक शुक्रवारी रात्री विलेपार्ले पूर्वेकडील बामनवाडा भागात दहीहंडी फोडण्यासाठी गेले होते. यावेळी दहीहंडीच्या सर्वात वरील सातव्या थरावरून कोसळून संदेश जखमी झाला होता.

दरम्यान संदेश दळवीचा रुग्णालयातील एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. शिवसेनेचे पदाधिकारी जितेंद्र जनावणे यांनी उपचारासाठी मदत केली असल्याचं त्यामध्ये दिसून येत आहे. उपचारादरम्यान सोमवारी रात्री ९ वाजता संदेशचे निधन झाले.

संदेश हा रिक्षा चालकाचे काम करत होता. तर त्याचे वडीलही रिक्षा चालक होते. त्याची आई ही घरकाम करत असे. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चाले, अशी माहिती स्थानिकांनी दिली. दरम्यान दुर्घटनेनंतर याप्रकरणी पोलिसांनी दहीहंडी आयोजकाविरोधात गुन्हा नोंदविला आहे. संदेशच्या मृत्यूनंतर आता निष्काळजीपणामुळे मृत्यूस जबाबदार झाल्याप्रकरणीचे कलम पोलिसांकडून या गुन्हात समाविष्ट केले जाणार आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीपाद काळे यांनी दिली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!