Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : चर्चा १२ आमदारांच्या नावांची , कोण कोण होतील विधानपरिषदेचा आमदार ?

Spread the love

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार गेले पण त्यांनी पाठवलेल्या विधान परिषदेच्या १२ आमदारांची नावे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजूर केली नाही. मात्र महाराष्ट्रात सत्तांतर होताच  शिंदे- फडणवीस सरकारने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली यादी रद्द करून ती नव्याने पाठवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे या सरकारकडून १२ नवीन नावांची शिफारस करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यापैकी ८ नावे भाजपकडून तर ४ नावे शिंदे गटाकडून येण्याची शक्यता आहे.


भाजपकडून या आठ जागांसाठी भाजपाकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पंकजा मुंडे, चित्रा वाघ, कृपाशंकर सिंह, गणेश हाके, सुधाकर भालेराव यांच्या नावांची चर्चा आहे. तर  चार जागांसाठी शिंदेगटातील माजी मंत्री रामदास कदम, विजय शिवतारे, अर्जुन खोतकर, नरेश म्हस्के, चंद्रकांत रघुवंशी, आनंदराव अडसूळ, अभिजित अडसूळ यांची नावे आघाडीवर आहेत.

विशेष म्हणजे आधीच्या महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली १२ आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेरपर्यंत मंजूर केली नव्हती. त्यातच राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या १२ जागांसाठी नव्याने यादी पाठवण्याचे निश्चित केले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!