Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraMonsoonAssemblyUpdate : छगन भुजबळ आणि अजित पवारांनी गाजवला आजचा दिवस ….

Spread the love

मुंबई : आजचा विधानसभा अधिवेशनाचा दिवस विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी गाजवला. “पांढरी दाढी देशात, काळी दाढी राज्यात अन् भाषणावर GST”  अशा शब्दात छगन भुजबळ यांनी जोरदार बॅटिंग केली तर अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या मदतीची मागणी करीत सरकारच्या सत्कार कार्यक्रमावरून मुख्यमंत्र्यांना घेरले. 


शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारवर तोफ डागताना विरोधी पक्षनेते अजित पवार  म्हणाले कि, राज्यात दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यापासून मागच्या ४५ दिवसात १३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, अशी आकडेवारी जाहीर करत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींनी काय करायचं? शेतकऱ्यांना हे सरकार आपल्या जवळचे वाटत नाही याचे उत्तर मिळाले पाहिजे. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी धोरणे राबवा, अशी मागणीही अजित पवार यांनी केली. राज्यात झालेली अति     वृष्टी आणि पूरपरिस्थिती यामुळे शेतकरी अडचणीत आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठीच्या प्रस्तावावर ते अधिवेशनात बोलत होते.

धरणावर रात्री अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची सूचना

दरम्यान अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी दीड लाख रुपये मदत करावी अशी मागणीही अजित पवार यांनी पुन्हा एकदा केली. याशिवाय, राज्यात मागच्या दोन महिन्यात अतिवृष्टी झाली आहे. अजूनही पाऊस पडत आहे. राज्यातली सर्व धरणे भरलेली आहेत. हवामान खात्याने यापुढेही पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. यानंतर मोठा पाऊस झाला तर धरणातील पाणी ओव्हरफ्लो होऊन नदीकाठच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पाऊस संपेपर्यंत पाटबंधारे खात्याचा अधिकारी रात्रीच्या वेळी धरणावर असला पाहिजे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली. धरणातून पाणी सोडण्यात थोडी जरी चूक झाली तर त्याचा फटका खालच्या बाजूच्या लोकांना भोगावा लागू शकतो, याकडेही अजित पवार यांनी लक्ष वेधले.

शंभुराजे मध्ये बोलायचं नाही, अजित दादांनी सुनावले…

अजित पवार बोलत असताना शंभुराज देसाईंनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला तेंव्हा , सगळीकडे ओला दुष्काळ पडलाय आणि पाऊस जास्त झाला काय म्हणता, आपण एकत्र काम केलंय, मध्ये बोलायचं नाही असं म्हणत अजित दादांनी शंभुराज देसाईंना सुनावले , अजित पवार २००३ ला तत्कालीन आघाडी सरकारने कसा कृत्रिम पावसाचा प्रयोग केला त्याबाबत सांगत होते, यावरच शंभूराज देसाई पाऊस चांगला झालाय असं म्हटले होते.

दरम्यान एकीकडे माणसं मरतायत अन  दुसरीकडे मुख्यमंत्र्याचा दौरा सुरुय, क्रेनने हार घालतायत, असे सत्कार न करता शांतपणे घ्या अशी सूचना देणं अपेक्षित होतं, शेतकरी संकटात असताना त्याच्या मागे उभा राहणं गरजेचं होतं, यातूनच शेतकऱ्यांना बळ मिळतं, २००३ च्या दुष्काळात आपल्याकडे पाऊस पडत नव्हता, तेव्हा कृत्रिम पावसाचाही प्रयत्न आम्ही केला, तुमचे लोक क्रेनने हार घालून घेतात, अजून शेतकरी अडचणीत आहे, हे वागणं बरं नाही. आमच्यासोबत भेदभाव केला जातोय  असेही अजित पवार म्हणाले.

आपण कॅबिनेटमध्ये एकत्र घेतलेल्या निर्णयांनाच तुम्ही स्थगिती दिलीय, भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांना ५०-५० कोटींचा निधी दिलाय, पण आमच्यासोबत भेदभाव केला जातोय, शिंदे साहेब हे वागणं बरं न्हवं, सगळे दिवस सारखे नसतात, शिंदे साहेब, कधी आपल्याला एकत्र यावं लागेल याचा भरोसा नाही, अजित पवारांच्या या फटकेबाजीवर मुख्यमंत्र्यांनीही हात जोडले.

राहुल कुल इथंही मला अडवणार का, अजित दादांचा टोला

दरम्यान प्रारंभी अजित दादा बोलण्यासाठी उभे राहिले, मात्र त्यापूर्वी राहुल कुल यांना मुद्दा मांडू द्यावा अशी विनंती फडणवीसांनी केली, त्यावर राहुल कुल इथंही मला अडवणार का असा चिमटा घेऊन अजित दादा खाली बसले.

नाना पटोलेंची फडणवीसांवर टीका

जशी अजित दादांनी मागच्या सरकारने तिजोरीची चावी स्वतःकडे ठेवली, तशी तुम्ही यावेळी स्वतःकडे ठेवली असल्याचे नाना पटोले फडणवीसांना उद्देशून बोलले. सीएनजी, पेट्रोल, डिझेल सगळ्याचेच भाव वाढताहेत, प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लागतोय, कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्राच्या अपेक्षा वाढणे स्वाभाविक आहे, पण राज्यात याचे दर कसे कमी करता येतील याबाबत पाऊलं उचलायला हवेत, शेतीसाठी डिझेलची गरज लागते, डिझेलवर अनुदान देता येईल का याचा विचार करावा, शेतकऱ्याला मदत होईल असेही पटोले म्हणाले.

काळ्या – पांढऱ्या दाढीवरून छगन भुजबळ यांचे चिमटे …

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले कि , महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा दाढीवाले मुख्यमंत्री झालेत, पण त्यातही काळी दाढी आणि पांढऱ्या दाढीचा फरक आहे, पांढऱ्या दाढीचा प्रभाव देशभरात आहे. तर फडणवीसांना उद्देशून भुजबळ म्हणाले कि , तुमचं वजन केंद्रात वाढलंय, महाराष्ट्रालाही फायदा व्हायला हवा. अर्थमंत्री म्हणतात भारतात आर्थिक मंदी नाही, मग कशावरही जीएसटी लावायची गरज काय ? असा सवालही भुजबळ यांनी केला.

पॅकेजिंग फूडवर पाच टक्के जीएसटी लावलाय, त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो आहे. केंद्रात जे मंजूर होतं तेच तुम्ही इकडेही मंजूर करुन घेता, महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना केंद्रालाही सांगा, फडणवीसांचा दरारा दिल्लीत खुप वाढला असं ऐकलंय, त्यांनी दिल्लीत जाऊन परिस्थिती सांगायला हवी, “स्कूल चले हम जीएसटी के साथ…” अशा घोषणा लोक द्यायला लागले आहेत.

तुमचा रोख अजित दादांकडे होता का? जीएसटीच्या ४७ व्या फिटमेंट कमिटीच्या बैठकीत अजित दादा उपस्थित होते, केंद्र स्वतः कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, त्यात राज्यांचीही सहमती लागते, जे काही गैरसमज असतील ते एकत्रितपणे दूर करावे लागतील असेही भुजबळ म्हणाले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!