Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : रांजणगाव येथे भीषण अपघात ५ ठार

Spread the love

पुणे :  बुधवारी रात्री मध्यरात्रीच्या  सुमारास पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. त्यामध्ये, ५ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रांजणगाव एमआयडीसीतील एलजी कंपनीसमोर हा भीषण अपघात झाला. 

चुकीच्या दिशेने प्रवास करत असलेला ट्रक अचानक रोडच्या मधोमध आल्याने कारची आणि ट्रकची जोरदार धडक झाली. त्यामध्ये, कारमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १ जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. अपघातामध्ये संजय भाऊसाहेब म्हस्के (वय ५३), राम भाऊसाहेब म्हस्के (वय ४५), राम राजू म्हस्के (वय ७), हर्षदा राम म्हस्के (वय ४ वर्षे), विशाल संजय म्हस्के (वय १६) वर्ष यांचा मृत्यू झाला असून साधना राम म्हस्के या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.

या कारमधील सर्व प्रवासी पनवेलला जात होते, अशी प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. क्रेनच्या सहाय्याने वाहनं हटविण्यात आली आहेत.

Click to listen highlighted text!