Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Assembly Update : अधिवेशन काळात ” या ” आठ मंत्र्यांवर इतर खात्यांचीही जबाबदारी , अब्दुल सत्तार यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन तर भुमरेंकडे औकाफ ….

Spread the love

मुंबई  : आजपासून शिंदे फडणवीस यांच्या सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशन काळात नुकतेच  खातेवाटप झालेल्या ८ मंत्र्यांवर त्यांच्या खात्याशिवाय या इतर खात्यांचीही जबादारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

या आदेशानुसार १. संजय राठोड यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन आहे, पण पावसाळी अधिवेशनात ते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचं काम पाहतील. याशिवाय २. उदय सामंत यांना माहिती व तंत्रज्ञान, ३. शंभुराज देसाई यांना परिवहन, ४. दादा भुसे यांना पणन, ५. तानाजी सावंत यांना मृदु व जलसंधारण, ६. अब्दुल सत्तार यांना मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन,७.दीपक केसरकर यांना पर्यावरण व वातावरणीय बदल, विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच ८. संदीपान भुमरे या गैर मुस्लिम असलेल्या मंत्र्यावर अल्पसंख्याक व औकाफ या विभागांची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.

Click to listen highlighted text!