Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RSSNewsUpdate : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ध्वजारोहण

Spread the love

नागपूर : देशात ७५ व स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून  नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नागपूरमधील मुख्यालयातही आज सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला. यावेळी राष्ट्रगीतासह राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली.

नागपूरमध्ये आरएसएसच्या मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी भागवत यांच्यासह आरएसएसमधील वरिष्ठ पदाधिकारी तसेच स्वसंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर येथे राष्ट्रगीत आणि भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या.

Click to listen highlighted text!