Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharastraNewsUpdate : मुकेश अंबानी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी ….

Spread the love

मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याने ३ तासात कुटुंबाला मारण्याची धमकी दिली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तडक फडकी कारवाई करीत एका संशयिताला घेतले आहे.


मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी आज सकाळी देशाचा ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना दिसले होते. त्यांचा व्हिडिओ देखील प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर एक मोठी बातमी समोर आली आहे. अंबानी कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकीचे कॉल आले. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या फोन नंबरवर ४ ते ५ वेळा धमकी देणारा फोन आला होता. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने डीबी मार्ग पोलिसांना याबद्दल माहिती दिली आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार फोन करणारी व्यक्ती मनोरुग्ण असावी. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मुकेश अंबानी आणि कुटुंबाला धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील अंबानी कुटुंबाला धमकीचे फोन आले होते. पोलिसांकडून या फोनची चौकशी सुरू आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांकडून अंबानी कुटुंबीयांची सुरक्षा वाढवली जाऊ शकते.

तदरम्यान क्रार प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने  सूत्रे फिरवत बोरिवलीतील एमएचबी कॉलनीमधून एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने  फोनवर आपलं नाव अफझल असल्याचे  सांगितले  होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणे, जीवे मारण्याची धमकी देणे, अर्वाच्च भाषा वापरणे याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोरील व्यक्ती हा वारंवार एकच बोलत होता, मी अंबानी कुटुंबीयांना मारणार आहे, त्यांना मरावेच लागणार आहे, असं तो फोनवर बोलत होता. पोलिसांनी हे फोन कॉल रेकॉर्ड ऐकले आणि पुढील तपास सुरू केला होता.

Click to listen highlighted text!