Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

VinayakMeteNewsUpdate : शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांचे रस्ते अपघातात निधन, अनेकांची श्रद्धांजली ….

Spread the love

मुंबई : मराठा समाजाचे प्रमुख नेते आणि शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांचे रस्ते अपघातात निधन झाले. मुंबई-पुणे एक्स्प्रेसला सकाळी हा अपघात झाला. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलिस स्टेशन परिसरातील माडप बोगद्याजवळ पहाटे ५.१५ च्या सुमारास हा अपघात झाला.

अपघाताच्या वेळी त्यांच्यासोबत  बॉडीगार्ड आणि त्यांचा  चालक होता, असे त्यांनी सांगितले. माडप बोगद्याजवळ एका वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली आणि सर्वजण गंभीर जखमी झाले. या सर्वांना नवी मुंबईतील कामोठे येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले असता मेटे यांना मृत घोषित करण्यात आले.

मेटे हे मराठा समाजाच्या आरक्षणाचे कट्टर समर्थक होते. ५२ वर्षीय मेटे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्यही राहिले आहेत. अपघाताची माहिती मिळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात पोहोचले.

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील असलेले माजी आमदार मराठा आरक्षणाचे समर्थक होते. ते एका बैठकीला जाण्यासाठी मुंबईला निघाले होते. या अपघातात त्यांचे बॉडीगार्ड  पोलीस जवान राम ढोबळे हे देखील गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुख्यमंत्री शिंदे, शरद पवार यांच्यासह अनेकांकडून दुःख व्यक्त

दरम्यान अपघाताचे वृत्त समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मेटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मेटेंच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हटले आहे कि , “आजच्या सकाळची सुरुवात ही अत्यंत धक्कादायक पद्धतीने झाली आहे. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी विनायक मेटेंच्या  निधनाचे वृत्त समजले. त्यामुळे धक्काच बसला. शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या मेटेंचा जन्म झाला. आपल्या लहान गावातून समाजाच्या हितासाठी भूमिका घेण्याचा निर्धार करुन एखादी व्यक्ती राज्य पातळीवर आपला प्रभाव कसा पाडतो याचे उदाहरण म्हणजे विनायक मेटे” असल्याची प्रतिक्रिया पवारांनी दिली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मेटेंच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. विनायक मेटे यांचं अपघाती निधन हे दुर्देवी घटना आहे. मला खूप दुःख होत आहे. मेटे माझे अत्यंत जवळचे मित्र होते. अनेक वेळा त्यांची आणि माझी भेट झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये विकास कामांमध्ये त्यांनी नेहमी भाग घेतलेला आहे. त्यांच्याशी माझे अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांचा अपघाती निधन हे महाराष्ट्रचं मोठे नुकसान असून आम्ही आपला एक चांगला मित्र गमावला असल्याची भावना गडकरींनी व्यक्त केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!