Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BiharPoliticalUpdate : बिहारचे महाभारत : जेडीयूचे अध्यक्ष ललन सिंह यांचे भाजपवर प्रहार …

Spread the love

पाटणा : बिहारमध्ये भाजपसोबतची युती तोडण्याच्या नितीश कुमारांच्या निर्णयाबाबत जेडीयूचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ ​​ललन सिंह यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर कठोर प्रहार केले. ललन सिंह म्हणाले कि , “नितीशकुमार यांनी घेतलेल्या  निर्णयामुळे सर्वजण खूश आहेत. २०२० मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि आमच्या लोकांनी भाजपला जिंकून दिले पण  त्यांनी आमचाच  पराभव केला. त्यांनी आघाडी धर्म पाळला नाही. अरुणाचल प्रदेशात ६ आमदार फोडले. इटानगरमध्ये, तरीही आम्ही नागरी संस्थांच्या निवडणुकीत  चांगली कामगिरी केली.”

भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले कि, “२०१९ मध्ये तुम्हाला पंतप्रधान व्हायचे होते, तेंव्हा त्यांनी काहीच गडबड केली नाही, पण २०२० मध्ये षड्यंत्र सुरू झाले. नितीशकुमार यांनी ज्याला राष्ट्रीय अध्यक्ष केले त्यालाच भाजपने जवळ केले. काही लोकांना भाजपनेच लोजपाचे तिकीट दिले आणि ते निवडणूक हरल्यानंतर पुन्हा भाजपमध्ये गेले. तसेच भाजपवर आणखी एक गंभीर आरोप करताना ललन सिंह म्हणाले कि , ” तुम्ही नितीश यांच्याशी युती करू नका, असे राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांना फोनही आले होते.

भाजपला आम्ही समानतेची वागणूक दिली…

ललन सिंह म्हणाले, “नितीश कुमार यांना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, परंतु त्यांना जबरदस्तीने मुख्यमंत्री बनवले गेले. त्यानंतर भाजपचे नेते त्यांच्या विरोधात भडक विधाने करत राहिले. आम्हीही त्यांना समान वाटा दिला आणि त्यांचा आदर केला. मोठा किंवा लहान भाऊ कधीच म्हटले नाही. भाजपवर हल्लाबोल करताना जेडीयू प्रमुख म्हणाले की २०१५ मध्ये महाआघाडीत नितीश कुमार विजयी झाले होते, २०१७ मध्ये एनडीएमध्ये आलेल्या जनमताचा अपमान झाला नव्हता, आज जनमताचा अपमान झाला आहे.

बिहारची प्रगती नितीशकुमार यांच्यामुळे…

महागाई वाढत आहे, बेरोजगारी वाढत आहे, ३ लाख लोकांनी सैन्यदलाची परीक्षा दिली पण त्यांना नियुक्तीपत्र दिले गेले नाही. ४ वर्षे काम केल्यानंतर  अग्निवीर आज काय करणार? बिहारने आज जी प्रगती केली आहे ती नितीशकुमारांमुळेच. नितीश कुमार यांनी आरसीपी सिंह यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवला पण त्यांनी त्यांच्या पाठीत  खंजीर खुपसला आहे. त्यांनी अपमान केला आहे. सुशील मोदींवर मी काहीही बोलणार नाही, त्यांना  शिक्षा झाली आहे. रविशंकर प्रसाद आज बेरोजगार आहेत. संजय जयस्वाल यांच्याबद्दल काय म्हणावे ? त्यांनी तर युती धर्माचा अपमान केला आहे.

आयकर, ईडी, सीबीआयची आम्हाला भीती नाही…

लालन  सिंह पुढे म्हणाले, “नितीश कुमार यांना जेवढे सहन करावे लागले त्यांनी ते सहन  केले. नितीश कधीही उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार नव्हते.” आमच्या आमदारांना कोणीही फोडू शकणार नाही, आयकर, ईडी, सीबीआयची आम्हाला भीती नाही, असे सांगून ते  म्हणाले. आम्ही कोणतीही कंपनी चालवत नाही. त्यांनी सांगितले की, आरसीपी सिंगचा एक कर्मचारी त्यांच्यासोबत राहत होता. भाजपचे लोक भेटायला यायचे, प्रभारीही यायचे आणि जेडीयूच्या विरोधात कट रचायचे हे ते रोज पाहायचे. ही बाब आम्ही माध्यमांसमोर मांडणार आहोत. जेडी नेत्याने सांगितले की ते २०२४ पर्यंत हे पंतप्रधान राहतील याबद्दल शंका आहे कारण बंगाल आणि बिहार त्यांना पाठिंबा देणार नाहीत.

Click to listen highlighted text!