Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CWG 2022: निखत जरीनने सुवर्णपदक जिंकले, भारताची बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदकाची हॅट्ट्रिक…

Spread the love

नवी दिल्ली: वर्ल्ड चॅम्पियन निखत जरीनने रविवारी बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिलांच्या 50 किलो (लाइट फ्लायवेट) मध्ये सुवर्णपदक जिंकले. निखतने अंतिम सामन्यात आयर्लंडच्या कार्ली एमसी नॉलचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. दरम्यान भारताने  बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदकाची हॅट्ट्रिक केली आहे.


याशिवाय भारतीय बॉक्सरने या वर्षाच्या सुरुवातीला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकल्यानंतर आता बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. बर्मिंगहॅम (बर्मिंगहॅम 2022) मधील भारताचे हे आजचे चौथे सुवर्ण आणि एकूण 17 वे सुवर्ण आहे. अमित पंघल आणि नीतू घनघास यांच्यानंतर आज भारतासाठी बॉक्सिंगमधील तिसरे सुवर्ण आहे. यासह भारत, न्यूझीलंडला मागे टाकून पदकतालिकेत चौथ्या स्थानावर (भारत CWG 2022) पोहोचला आहे.

महिला बॉक्सर नीतू घनघासने किमान वजन (45-48 किलो) गटात सुवर्णपदक जिंकले. या दोन्ही बॉक्सर्सनी त्यांच्या अंतिम सामन्यात यजमान देश इंग्लंडचा प्रतिस्पर्धी संघाचा पराभव केला.

यासह भारताच्या एकूण पदकांची संख्या 48 झाली असून त्यात 17 सुवर्ण, 12 रौप्य आणि 19 कांस्य पदकांचा समावेश आहे.

4 सुवर्ण पदके – निखत जरीन (बॉक्सिंग), अल्धोस पॉल (पुरुष तिहेरी उडी), अमित पंघाल (बॉक्सिंग), नीतू घनघास (बॉक्सिंग).

1 रौप्य पदक – अब्दुल्ला अबुबकर (पुरुष तिहेरी उडी).

3 कांस्य पदके – अन्नू राणी (महिला भालाफेक), संदीप कुमार (पुरुष 10,000 मीटर रेस वॉक), महिला हॉकी संघ.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!