Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती

Spread the love

नवी दिल्ली :  उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय झाला आहे. त्यांनी विरोधकांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. जगदीप धनखड यांना तब्बल ५२८ तर मार्गारेट अल्वा यांना  १८२ मते मिळाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.  

आज सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान पार पडले. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यात ७१० मते वैध धरली गेली आणि यातील ५२८ मते  जगदीप धनखड यांना मिळाली. दरम्यान  तृणमूल काँग्रेसने निवडणुकीत सहभाग घेतला नाही. शिवाय आणखी काही पक्षांनी भाजपाला पाठिंबा दिला. त्यामुळे जगदीप धनखड यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला.

जगदीप धनखड यांच्या विजयानंतर भाजपा कार्यालयाबाहेर जल्लोष केला जात आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील जगदीप धनखड यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या मतदानात समाजवादी पक्षाच्या २, शिवसेनेच्या २ आणि बसपाच्या एका खासदाराची अनुपस्थिती होती. तर भाजपाचे खासदार सनी देओल आणि संजय धोत्रे आरोग्याच्या कारणास्तव मतदान करू शकले नाहीत. एकूण ७२५ खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

कोण आहेत जगदीप धनखड?

– सध्या ते पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी कार्यरत आहेत. जगदीप धनखड हे राजस्थानच्या झुंजनू गावात एका शेतकरी कुटुंबात जन्माला आले.

– राजस्थान हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष असलेले धनखड हे राजकारणातील अनुभवी व्यक्तिमत्व आहे. राजस्थानमधील जाटांना आरक्षण मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

– धनखड हे कायद्यावर प्रभुत्व असलेले, राजकारण, राजकीय डावपेच आणि प्रत्येक पक्षातील नेतेमंडळींशी मैत्रिपूर्ण संबंध असलेले असे व्यक्तिमत्व आहे.

 

Click to listen highlighted text!