Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HingoliNewsUpdate : हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, घरपोडी करणारी टोळी जेरबंद

Spread the love

हिंगोली/ जिल्हा प्रतिनिधी : हिंगोली येथे चोरी, घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखाने जेरबंद केली आहे. सदरील गुन्हेगारांची कसून चौकशी केली असता हिंगोली जिल्हयातील ०४ गुन्हे उघडकिस झाले असून, ०२ आरोपींना अटक केली असता त्या कडून १ लाख ६६ हजार रु. चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्हयात होणारे चोरी व घरफोडीचे गुन्हयांना आळा घालुन सदर गुन्हे करणारे आरोपी व त्यांचे टोळीला पकडण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक हिंगोली श्री एम. राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आदेश देवून वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यावरून श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाने जिल्हयात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या गुन्हयांचा घटनास्थळ व परीसराचा व असे गुन्हे करणा-या आरोपींबाबत गोपनीय रित्या माहीती घेवुन व तंत्रशुध्द तपास पध्दतीचे मदतीने अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपींबाबत माहिती घेतली असता परभणी येथील १) शेख खयुम शेख रफिक, वय २० वर्ष, व २) शेख रहिम उर्फ शेरा शेख चाँद, वय २४ वर्ष, दोन्ही रा. दर्गारोड, कुर्बाणी शाह नगर, परभणी यांनी हिंगोली जिल्हयात व इतर ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांना त्यांचे राहते घरातुन शिताफीने ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी चोरी व घरफोडीचे गुन्हे केल्याची व हिंगोली जिल्हयातील खालील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. ज्यात

१) पोस्टे हिंगोली ग्रामीण गुरनं. १५६ / २०२२ कलम ४५७, ४५४, ३८० भादंवी., २) पो.स्टे. सेनगाव गुरनं. २४७ / २०२१ कलम ४५४, ४५७, ३८० भादंवी.
३) पो.स्टे. वसमत शहर गुरनं. ३४४ / २०२१ कलम ४५४, ३८० भादंवी.
४) पो.स्टे. सेनगाव गुरनं. १४२ / २०२१ कलम ३७९ भादंवी.

आरोपींकडुन तपासा दरम्याण वरील गुन्हयातील सोन्याचे दागीने ज्यात झुंबर, कानातील बाळी, अंगठी, ओम व चांदीचे कडे असे सोन्या चांदिचे दागीने एकुण किंमत १,११,२०० रु. व नगदी ५५,०००/- रु. असा एकून १ लाख ६६ हजार २०० रू. चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपींनी विचारपुस दरम्यान हिंगोली जिल्हयासह परभणी, चाळीसगाव, आष्टी, बिदर (कर्नाटक), हर्सल औरंगाबाद येथे देखील अशाच प्रकारचे चोरी, घरफोडचे गुन्हे केल्याचे सांगीतले आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री एम. राकेश कलासागर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.श्री. उदय खंडेराय, स.पो.नि. सुनिल गोपिनवार, स. पो. नि. राजेश मलपिलु, पोलीस अंमलदार भगवान आडे, किशोर कातकडे, किशोर सावंत, आकाश टापरे, विठठल काळे, नितीन गोरे, ज्ञानेश्वर साळवे, तुषार ठाकरे, शेख जावेद सर्व स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली यांनी केली आहे.

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!