EknathSindeLatestUpdate : प्रकृती बिघडली , मुख्यमंत्री शिंदे यांना सक्तीची विश्रांती

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सक्त विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली असल्याने सर्व प्रशासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सततचे दौरे, सभा, कार्यक्रम यामुळे एकनाथ शिंदे यांना थकवा जाणवत असल्याची तक्रार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना हा सल्ला दिला आहे.
गेला महिनाभरापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सतत दौरे सुरु आहेत. दिल्ली दौऱ्याबरोबर महाराष्ट्र दौरा, उद्धाटनाचे कार्यक्रम, सत्कार समारंभ, जाहीर सभा, बैठका यामध्ये एकनाथ शिंदे सतत व्यस्त आहेत. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला असून त्यांना थकवा जाणवू लागला आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.