Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SanjayRautNewsUpdate : खा. संजय राऊत यांना ८ दिवसांऐवजी न्यायालयाकडून ४ दिवसांची ईडी कोठडी …

Spread the love

मुंबई :  पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी मंजूर केली आहे.  ईडीने संजय राऊत यांची न्यायालयाकडे ८ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र ८ दिवस ईडी कोठडीसाठी नकार देत संजय राऊतांना ४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.


काल रविवारी सकाळी संजय राऊत यांच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर सायंकाळच्या सुमारास राऊत यांना प्रारंभी अधिक चौकशीसाठी ताब्यात घेऊन रविवारी रात्री उशीरा ईडीने अटक केली. त्यानंतर आज संजय राऊतांना सत्र न्यायालयात न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांच्यासमोर रिमांडसाठी हजर केले. यावेळी जेष्ठ विधिज्ञ  अशोक मुंदरगी यांनी संजय राऊतांच्या बाजूने युक्तिवाद केला. तर ईडीच्यावतीने हितेन वेणेगावकर यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला.

यावेळी न्यायालयासमोर संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांच्याकडून संजय राऊत यांना दरमहा २ लाख रुपये दिले जायचे असा आरोप ईडीने केला आहे. तसेच संजय राऊत यांच्या परदेश दौऱ्यासाठीही प्रविण राऊत यांनी पैसा दिला होता असाही दावा ईडीने केला. २०१०-११च्या दरम्यान संजय राऊतांनी अनेक परदेश दौऱ्यांना फायनान्स करण्यात आले होते, असा आरोपही ईडीने केला.

दरम्यान महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सुनिल राऊत हे एक व्यवसायिक आहे, असा युक्तिवाद संजय राऊतांच्या वकिलांमार्फत करण्यात आला. कोठडी द्यायची असेल, तर कमी दिवसांची द्या, अशी मागणीही राऊतांच्या वकिलांकडून करण्यात आला. संजय राऊतांच्या अनेक कंपन्या आहे. सर्व पैसे कायदेशीररित्या आले आहे, असा दावाही यावेळी करण्यात आला.

दरम्यान, संजय राऊतांच्या अटकेनंतर त्यांचे भाऊ आमदार सुनिल राऊत यांनी पत्रा चाळ आणि संजय राऊतांचा काडीमात्र संबंध नसल्याचे सांगितले. अटक करण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून पत्रा चाळ प्रकरण पुढे केले  आहे. हा शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. संजय राऊत यांना अटक करण्यासाठी फ्रेम तयार केली. त्यात बोगस कागदपत्रे लावले आहेत. ईडी त्यांचे  काम करेल आम्ही आमचे  काम करु, असे  सुनील राऊत  यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!