Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

EknathShindeNewsUpdate : मुख्यमंत्र्यांनी घेतले आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन

Spread the love

मुंबई  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सोमवारी (१ ऑगस्ट) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली . या भेटीत आपण मुख्यमंत्रीपदाच्या आपल्या कारकिर्दीसाठी डॉ.मोहन भागवत यांचे आशीर्वाद देऊन मौलिक मार्गदर्शन घेतल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (१ ऑगस्ट) आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची त्यांच्या दादर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.  यावेळी मोहन भागवत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पुस्तकरुपी भेट दिली. शिंदे-फडणवीस आणि मोहन भागवात यांच्यात विविध विषयांवर पाऊण तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या भेटीबद्दल एकनाथ शिंदे यांनी अधिकची माहिती दिली आहे. ” देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री तसेच मी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मोहन भागवत यांची पहिल्यांदाच भेट घेतली. याआधीही मी त्यांना भेटलेलो आहे. आमचे सरकार हिंदुत्व या समान विचारधारेला घेऊन स्थापन झालेले आहे. त्यासाठी आम्ही त्यांचे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे घेऊन जात आहोत,” अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

या भेटीबद्दल ट्विटद्वारे माहिती देताना शिंदे यांनी म्हटले आहे कि, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांची त्यांच्या दादर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री उपस्थित होते. यासमयी माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीसाठी डॉ.मोहन भागवत यांनी अनेक आशीर्वाद देऊन मौलिक मार्गदर्शन केले.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!