Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SanjayRautNewsUpdate : संजय राऊत यांच्या ईडी प्रकरणावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया …

Spread the love

मुंबई : ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानावर आज छापा टाकला. या छाप्या दरम्यान सकाळपासून संजय राऊतांची चौकशी केली जात आहे. राऊतांवरील या  कारवाईवर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे कारस्थान लज्जा आणि शरम सोडून सुरु आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत शिवसैनिकांना संबोधित करत होते.

उद्धव ठाकरेंनी राज्यपाल भतसिंह कोश्यारी यांनी मुंबई आणि महाराष्ट्रावर केलेल्या आक्षेपार्ह विधानावरही एकदा भाष्ये केले. “जो महाराष्ट्राच्या मुळावर येईल, त्याचा आदर करणे शक्यच नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. “यांना आता हिंदुत्वाचा पुळका आला आहे. कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा धीर पाहिला मात्र कोल्हापूरचे जोडे पाहिले नाही, या भाषेत मी बोललो आणि बोलणारच. जो महाराष्ट्राच्या मुळावर येईल त्याचा आदर शक्यच नाही,” असेदेखील उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, आज रविवार (३१ जुलै) ईडीने संजय राऊतांच्या घरावर धाड टाकली आहे. सकाळपासून राऊतांची चौकशी केली जात आहे. राऊतांना अटक करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे काहीही केले तरी मी शिवसेनेतच राहणार आहे. शिवसेना सोडणार नाही. मी शेवटपर्यंत संघर्ष करणार आहे, अशी प्रतिक्रिया राऊतांनी ट्वीटमार्फत दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!