Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : प्रसिद्ध वक्त्या सुषमा अंधारे शिवसेनेत दाखल , उपनेतेपदाची जबाबदारी

Spread the love

मुंबई : फुले , शाहू , आंबेडकरी चळवळीतील प्रसिद्ध वक्त्या सुषमा अंधारे यांनी आज  उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करीत हातावर शिवबंधन बांधून घेतले . यावेळी जय भीम , जय शिवाजी , जय भवानीच्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांना पक्षाच्या उपनेतेपदाची जबाबदारी सोपवली.


सुषमा अंधारे या फुले-शाहू आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या तसेच प्रसिद्ध वक्त्या आहेत. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या कि,  आपल्या सर्वांचा एकच संवैधानिक शत्रू असेल, तर उद्धव ठाकरेंचे नेतृत्व आम्हाला मान्य आहे. सुषमा अंधारे याआधी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक होत्या. विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचा जोमाने प्रचार केला होता.

दरम्यान “शिवसेनेत काय जबाबदारी असेल. कोणतं लाभाचं पद असेल, असे मला विचारले जात आहे. पण माझ्या डोक्यावर ईडीच्या फाईलींचं ओझं नाही. किंवा अमित शाहा यांनी कोणतेही प्रलोभन दिलेले नाही. मी आतापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची लेक म्हणून लौकिक मिळवला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शिसैनिकाच्या घरातील बहीण, लेक होण्याचा मी प्रयत्न करेन. हीच जागा सर्वात मोठी आहे, असे मला वाटत आहे. नीलम गोऱ्हे माझ्यासाठी कायम आदर्श राहिलेल्या आहेत. त्या माझ्यासाठी आईसारख्या आहेत,” असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

तर दुसरीकडे “बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने अनेक सामान्य माणसांना असामान्य केलं. जे लोक असामान्य झाले ते शिवसेनेतून निघून गेले. आता परत एकदा सामान्यातून असामन्य माणसं घडवण्याची वेळ आली आहे. सुषमा अंधारे यांचे मी मनापासून स्वागत करतो,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांचे शिवसेनेत स्वागत गेले. तसेच उद्धव ठाकरे यांनी मी अंधारे यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी सोबवतो, असेही सर्वांसमोर जाहीर केले.

संजय जाधव आणि प्रशांत सुर्वे यांचाही प्रवेश

सुषमा अंधारे यांच्याशिवाय  शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांचे भाऊ संजय जाधव आणि शिंदे गटात गेलेल्या बंडखोर खासदार भावना गवळी यांचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांनीदेखील आपल्या हातावर शिवबंधन बांधलं आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

प्रशांत सुर्वे हे व्यवसायाने वैमानिक असून त्यांनी अनेक वर्षे एअर इंडिया आणि इंडियो विमान कंपनीत वैमानिक म्हणून काम केलं आहे. २०१४ साली त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली होती. तर २०१३ साली भावना गवळी आणि प्रशांत सुर्वे यांचा घटस्फोट झाला होता.

दरम्यान शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले कि , “२०१३-१४ साली आपण शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत उद्धव ठाकरेंकडे विचारणा केली होती. पण तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या मला हे योग्य वाटत नाही. मी पक्षाकडून कोणतीही जबाबदारी देऊ शकणार नाही. त्यावर मी त्यांना आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं, तेव्हा उद्धव ठाकरेंनी मला थांबवलंही  नाही किंवा पाठिंबाही दिला नाही.” उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे खूप वर्षांपासूनचे संबंध आहेत. हे संबंध अधिक घट्ट करण्यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केला आहे. येथून पुढे आपण एक शिवसैनिक म्हणून वाशिम जिल्ह्यासाठी काम करणार आहोत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!