Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : बंगालच्या मंत्र्याच्या निकटवर्तीयाच्या घरातून पुन्हा सापडली १५ कोटींची रोकड , कोट्यवधींचे दागिनेही जप्त…

Spread the love

नवी दिल्ली : बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेले बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून पुन्हा एकदा नोटांचा खजिना सापडला आहे. यामध्ये १५ कोटींची रोकड आणि दागिन्यांचा समावेश आहे. दरम्यान याशिवाय मालमत्तेची कागदपत्रे आणि विक्रीपत्रही सापडले आहे. छापेमारी अजूनही सुरूच असल्याचे वृत्त आहे. 

याबाबत मिळालेल्या  माहितीनुसार, अर्पिता मुखर्जीच्या कोलकाता येथील दुसऱ्या घरातून १५ कोटी रुपये रोख आणि करोडो रुपयांचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. नोटांची मोजणी अजूनही सुरूच आहे. सोन्याचे दागिने, सोन्याचे बार जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय मालमत्तेची कागदपत्रे आणि विक्रीपत्रही सापडले आहे. तत्पूर्वी बुधवारी सायंकाळी तपास अधिकाऱ्यांचे पथक पोहोचले असता फ्लॅटची चावी नसल्यामुळे अधिकारी कुलूप तोडून आत घुसले.

आधी आढळून आली  २० कोटीहून अधिक रक्कम…

अधिक वृत्तानुसार, अर्पिता मुखर्जीच्या या घरातून मोठी वसुली पाहून अधिकारीही चक्रावून गेले. विशेष म्हणजे नोटा मोजण्यासाठी बँक अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले आणि नोटांची मोजणी सुरू करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर काही मालमत्तेची कागदपत्रेही सापडली आहेत. ईडीला कपाटातून रोख रक्कमही मिळाली आहे. नोटा मोजण्याचे यंत्र घेऊन बँक अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. यापूर्वी, तपास यंत्रणेने अर्पिताच्या घरातून २०.९ कोटी रुपये रोख आणि सर्व मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली होती.

घोटाळ्यातून कमावलेली रक्कम असल्याचा ईडीचा दावा…

आजच्या धाडसत्राच्या वेळी तपास यंत्रणेचे अधिकारी जेव्हा या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा त्याला कुलूप होते. हे कुलूप तोडून अधिकारी आतमध्ये शिरले असता तेथेही मोठ्या प्रमाणात चलन पाहून ते थक्क झाले. पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी सध्या 3 ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत. पार्थ यांना  अटक केल्यानंतर तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना  रुग्णालयात दाखल करावे लागले. शिक्षण भरती घोटाळ्याबाबत त्यांची सातत्याने चौकशी केली जात आहे. दरम्यान अर्पिताच्या घरातून मिळालेली रक्कम ही शैक्षणिक भरती घोटाळ्यातून कमावलेली रक्कम असल्याचे ईडीचे म्हणणे आहे, जे पार्थ चॅटर्जीचे आहे.

दरम्यान  बंगाल सरकारमधील ज्येष्ठ मंत्री पार्थ चॅटर्जी यांना त्यांच्या  राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला असता ते भडकले. त्याची गरज काय असे उत्तर त्यांनी दिले. शिक्षक भरती घोटाळ्यात नाव समोर आल्यानंतर चॅटर्जी सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत आहेत. कोलकाता येथील जोका येथील ईएसआय हॉस्पिटलबाहेर त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला. सकाळी चॅटर्जी आणि त्यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांना ईडीच्या चौकशीपूर्वी नियमित तपासणीसाठी नेण्यात आले. मंत्री यांना कडक सुरक्षेत रुग्णालयात नेण्यात आले आणि तेथून सुमारे दोन तासांनंतर केंद्रीय एजन्सीने त्यांना शहरातील सॉल्ट लेक परिसरातील सेजू कॉम्प्लेक्सच्या ईडी कार्यालयात नेले.

काय आहे प्रकरण ?

ईडीचे म्हणणे आहे की, शाळांमधील अनियमिततेच्या तपासासंदर्भात बुधवारी पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर छापे टाकण्यात आले. अर्पिताची मालमत्ता सापडलेल्या राजदंगा आणि बेलघरियासह काही ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही अर्पिताचे बेलघरियातील काही फ्लॅट्स आणि राजदंगा (दक्षिण भागात) आणखी एक फ्लॅट शोधून काढला आहे. अधिकारी तेथेही काही आहे का ? याचा शोध घेत आहेत. बेलघारियामध्ये अर्पिताच्या दोन फ्लॅटपैकी एका फ्लॅटचे कुलूप तुटले, तेव्हा तिची चावी सापडली नाही. ईडीच्या म्हणण्यानुसार, अर्पिता मुखर्जी तपासात सहकार्य करत असली तरी मंत्र्यांची वृत्ती उलट आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!