Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : पंतप्रधानांचे विरोधकांवर टीकास्त्र

Spread the love

कानपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी विरोधकांवर विकासकामांमध्ये अडथळे आणल्याचा आरोप करत कोणत्याही पक्षाच्या आणि व्यक्तीच्या विरोधाचे देशाच्या विरोधामध्ये रूपांतर न करणे ही प्रत्येक राजकीय पक्षाची जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी विरोधी पक्षावर टीका केली. 

समाजवादी पक्षाचे (एसपी) माजी राज्यसभा सदस्य हरमोहन सिंग यादव यांच्या १० व्या पुण्यतिथीनिमित्त कानपूर येथे आयोजित एका चर्चासत्रात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले कि , “अलीकडच्या काळात विचारसरणी किंवा राजकीय स्वार्थाची तुलना करावी लागते. एकीकडे समाज आणि देशाचे हित जोपासण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे तर  विरोधी पक्ष कधी-कधी सरकारच्या कामकाजात अडथळे आणतात त्यामुळे घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करू शकत नाहीत. आणि निर्णय लागू केले तर ते विरोध करतात. देशातील जनतेला ते आवडत नाही.”

समाज ही आपली संस्कृती…

मोदी पुढे म्हणाले कि , “कोणत्याही पक्षाच्या आणि व्यक्तीच्या विरोधाचे देशाच्या विरोधामध्ये रूपांतर करू नये ही प्रत्येक राजकीय पक्षाची जबाबदारी आहे. विचारधारांचं स्थान आहे आणि असलं पाहिजे. राजकीय महत्त्वाकांक्षाही असू शकते, परंतु देश प्रथम येतो.” ते म्हणाले, “लोहियाजींचा असा विश्वास होता की समाजवाद हे समतेचे तत्त्व आहे. समाजवादाच्या पतनाने त्याचे विषमतेत रूपांतर होऊ शकते, असा इशारा ते देत असत. आम्ही भारतात या दोन्ही परिस्थिती पाहिल्या आहेत.” मोदी म्हणाले, “आम्ही पाहिले आहे की भारताच्या मूळ कल्पना हा सामाजिक चर्चेचा विषय नाही. आपल्यासाठी समाज ही आपली सामूहिकता आणि सहकार्याची रचना आहे. समाज ही आपली संस्कृती आहे, संस्कृती हा आपला स्वभाव आहे.

पंतप्रधान म्हणाले, “हरमोहन सिंग यादव दीर्घकाळापासून राजकारणात सक्रिय आहेत आणि त्यांनी विधान परिषद सदस्य, आमदार, राज्यसभा सदस्य आणि अखिल भारतीय यादव महासभेचे अध्यक्ष म्हणून विविध पदांवर काम केले आहे. हरमोहन सिंग यादव यांचे चौधरी चरण सिंग आणि राम मनोहर लोहिया यांच्याशी जवळचे संबंध होते. ते म्हणाले की, हरमोहन सिंग यादव यांच्यासह त्यांचे पुत्र आणि विधान परिषदेचे माजी अध्यक्ष सुखराम सिंह यांनीही कानपूर आणि आसपासच्या अनेक शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. 1984 च्या शीखविरोधी दंगलीत अनेक शिखांचे प्राण वाचवल्याबद्दल हरमोहन सिंग यादव यांना 1991 मध्ये शौर्य चक्र प्रदान करण्यात आल्याचे मोदी म्हणाले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!