Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaAccidentUpdate : बसच्या भीषण अपघातात ८ ठार २० जखमी

Spread the love

लखनौ : उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्सप्रेसवेवरील बाराबंकी येथे सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे २० प्रवासी जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका डबलडेकर बसने मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या डबलडेकर बसला धडक दिल्याने हा अपघात झाला. त्यातच ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे, त्यांना लखनौच्या ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.

लोणीकत्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरेंद्रपूर मद्राहा गावाजवळ ही घटना घडली. या दोन्ही डबलडेकर बस बिहारमधील सीतामढी आणि सुपौल येथून दिल्लीला जात असल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताचे वृत्त समजताच एएसपी मनोज पांडे यांच्यासह पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी हजर होऊन मदत आणि बचाव कार्य सुरूकेले. जखमींना सीएचसी हैदरगडमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर गंभीर जखमींना लखनौला रेफर करण्यात आले आहे.

उत्तराखंड येथे ६ कावडीयांचा मृत्यू

दरम्यान  हरिद्वार, उत्तराखंडमध्ये रविवारी झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातात सहा कावडीयांचा मृत्यू झाला, तर अन्य एका घटनेत कावडीयांच्या दोन डझन दुचाकींनी अचानक पेट घेतला. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. पोलीस अधीक्षक योगेंद्र सिंह रावत यांनी सांगितले की, रविवारी हरिद्वारच्या हर की पौरी भागात राष्ट्रीय महामार्गावर आनंद वन समाधीजवळ असलेल्या पार्किंगमध्ये अचानक आग लागल्याने कावडीयांच्या सुमारे दोन डझन दुचाकी जळून खाक झाल्या. या अधिकाऱ्याने सांगितले की, वेगवेगळ्या अपघातात सहा कावडीयांचा मृत्यू झाला आहे.

बैरागी येथे झालेल्या अपघातात ट्रकने चिरडून दोन कावडीयांचा जागीच मृत्यू झाला, तर राष्ट्रीय महामार्गावरील प्रेम नगर चौकाजवळ कावडीयांची दुचाकी ऑटोला धडकली, यात दोन कावडीयांचा जागीच मृत्यू झाला. बहादराबाद आणि कालियार येथे झालेल्या अपघातात प्रत्येकी एका कावडीयाचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!