Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : मोस्ट वॉन्टेड चोरटा मुकुंदवाडी पोलिसांनी केला जेरबंद

Spread the love

औरंगाबाद- औरंगाबाद शहरासह जालना, घनसावनगी, शेवगाव, पोलिसांना वॉंटेड असलेला आरोपी मुकुंदवाडी पोलिसांनी शनिवारी रात्री ११ वा, जेरबंद केला.पुढील तपासासाठी त्याला बेगमपुरा पोलिसांच्या हवाली केले आहे

पंडित रणजित चव्हाण (३२)रा, गुरुपिंपरी घनसावनगी हलली मु, गेवराई तांडा असे अटक आरोपीचे नाव आहे, त्याच्या नावावर अंदाजे २० ते २५ घरफोडया व मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मुकुंदवाडी भागात पंडित चव्हाण गुन्हे करण्याच्या उद्देश्याने फिरत असल्याची माहिती खबऱ्याने पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांना दिली त्यानुसार पीएसआय बाळासाहेब आहेर यांनी पथकासह जाऊन त्याला अटक केली, शहरातील बेगमपुरा, वाळूज औद्योगिक पोलीस ठाणे याठिकाणी गुन्हे दाखल आहेत जालना पोलीस त्याला २० मोटरसायकल चोरीच्या प्रकरणात शोधत होते.

त्याच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यासाठी पुढील कारवाई पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली जात आहे, या कारवाईत पोलीस कर्मचारी नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे, मनोहर गीते , सुखदेव जाधव, संतोष भानुसे यांनी सहभाग नोंदवला होता

आपलं सरकार

Click to listen highlighted text!