Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BiharNewsUpdate : बिहारमधील सारण जिल्ह्यात फटाका व्यापाऱ्याच्या घरात स्फोट , ६ ठार

Spread the love

पाटणा : बिहारमधील सारण जिल्ह्यात एका फटाका व्यापाऱ्याच्या घरात स्फोट झाला आहे. स्फोटानंतर घराला आग लागली आणि घर कोसळले. या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आतापर्यंत ८ जखमींना घराबाहेर काढण्यात आले आहे. त्याचबरोबर अनेक लोक घराच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचेही वृत्त आहे. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले.

हे प्रकरण जिल्ह्यातील खैरा पोलीस स्टेशन हद्दीतील खुदाई बाग गावातील आहे. फटाके व्यावसायिक शाबीर हुसैन यांच्या घरी घरी स्फोट झाला आहे.  हे घर नदीच्या काठावर वसले होते, त्यात घराचा मोठा भाग कोसळून पडला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आतापर्यंत मृतांच्या संख्येबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मात्र अपघाताच्या वेळी त्या घरात आणि शेजारील घरात १० हून अधिक लोक उपस्थित होते, जे ढिगाऱ्याखाली दबले गेल्याचे सांगण्यात येत आहे.

ज्या घरात स्फोट झाला ते घर फटाके बनवायचे. अचानक घराचा स्फोट झाला. सुमारे तासभर घरात सतत स्फोट होत होते. त्यामुळे पोलिस-प्रशासनाचे पथक आणि स्थानिक लोकांना त्या घराजवळही जाता आले नाही.

सारण जिल्ह्याचे एसपी संतोष कुमार यांनी एएनआयला सांगितले की, छप्रा येथील या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबले असल्याची शक्यता आहे. हा स्फोट कशामुळे झाला याचा आम्ही सध्या तपास करत आहोत. फॉरेन्सिक टीम आणि बॉम्ब डिस्पोजल टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!