Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : दगड मनावर कि डोक्यावर ? मला माहित नाही , शरद पवार यांच्या कोपरखळ्या !!

Spread the love

पुणे : भाजपने एकनाथ शिंदे यांना मनावर दगड ठेऊन मुख्यमंत्रीपद दिलं की डोक्यावर दगड ठेवून मुख्यमंत्रीपद दिलं, हे मला माहिती नाही. हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख  शरद पवार यांनी भाजपला चांगल्याच कोपरखळ्या मारल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना,  मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे, असे म्हटले होते याबद्दल पवार यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी भाजपवर अशी उपरोधिक टीका केली. 

शरद पवार पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. शिंदे-फडणवीस सरकारच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी विचारले असता ते म्हणाले कि , ठीक आहे, आता त्यांनी सरकारच असंच चालवायचं ठरवलं आहे. साधारणत: संबंध सत्ता केंद्रित ठेवून दोघांनीच सरकार चालवायचे, ही भूमिका त्यांनी स्वीकारलेली दिसत आहे. त्याला त्यांच्या राज्यातील सहकाऱ्यांची आणि केंद्रातील नेतृत्त्वाची संमती आहे. ते सत्ताधारी आहेत. ते जे काही करतील, ते आपल्याला स्वीकारावं लागले, असे शरद पवार यांनी म्हटले.

दरम्यान यावेळी शरद पवार यांना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेविषयी विचारले असता ते म्हणाले कि,   पोराबाळांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देण योग्य नाही. शिंदे यांच्या सुरक्षेबद्दल बोलताना ते म्हणाले कि , सुरक्षा कुणाला द्यायची याची चर्चा कॅबिनेटमध्ये होत नाही. मुख्य सचिव, गृहसचिव, डीजी होम या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती असते. त्यांच्या बैठकीत याबाबत निर्णय होतो. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला सांगितलं की त्यांना झेड दर्जाची सुरक्षा होती. गडचिरोलीचे पालकमंत्री असल्यानं त्यांना अधिकची सुरक्षा दिली होती, असंही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितल्याची माहिती शरद पवारांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!