Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HealthNewsUpdate : “मंकीपॉक्स” पासून सावधान , जागतिक आरोग्य संघटनेचे सतर्कतेचा इशारा …

Spread the love

नवी दिल्ली : जगभरात मंकीपॉक्सच्या वाढत्या  विषाणूंमुळे जागतिक आरोग्य संघटनेने खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून  या आजाराला  “सार्वजनिक आरोग्य आणीबाणी” म्हणून घोषित करण्यात आले आहे. जगातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने सतर्कतेचा इशारा दिला आहे . जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख  टेड्रोस रिसोर्सेस गेब्रेयसस  यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

या आजाराच्या वाढत्या संसर्गाबाबत सावधगिरी बाळगण्याच्या सूचनाकारतानाचाच जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मंकीपॉक्स व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी तात्काळ पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. जगातील ७० देशांहून अधिक ठिकाणी मंकीपॉक्सची रुग्णसंख्या आहेत. भारतातही तीन रुग्ण आढळले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगभरात मंकीपॉक्सच्या १४,००० रुग्णसंख्येची पुष्टी केली आहे. तर आफ्रिकेत मंकीपॉक्समुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. २००७ पासून जागतिक आरोग्य संघटनेकडून जाहीर केलेली सातवी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी आहे.

मंकीपॉक्सची लक्षणे अशी आहेत…

जागतिक तज्ज्ञांच्या मते ‘मंकीपॉक्स’ हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.

‘मंकीपॉक्स’ ची लागण झालेल्या एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, संक्रमित प्राणी देखील या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने, किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे देखील ‘मंकीपॉक्स’ पसरू शकतो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये ‘मंकीपॉक्स’ची सर्वाधिक प्रकरणे आढळतात. मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे किंवा आयात केलेल्या प्राण्यांमुळे हा विषाणू पसरतो.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!