Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : आदित्य ठाकरे यांची बंडखोर आमदारांच्या विरोधात चौफेर फटकेबाजी

Spread the love

नाशिक : शिवसेनेतून बंडखोरी करीत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार करून स्वतः मुख्यमंत्रीपदी बसलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटात गेलेल्या आमदारांच्या विरोधात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी सुरु केली आहे. सध्या आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरु केली आहे. आज नाशिकमध्ये त्यांनी बंडखोरांच्या विरोधात तुफान फटकेबाजी केली.

https://twitter.com/AUThackeray/status/1550063509802975232

या यात्रेच्या दरम्यान बोलताना ते म्हणाले कि, “बंडखोरी केलेल्या आमदारांना आम्ही काय कमी केलं होतं? आपल्याजवळ जे जे होतं, ते त्यांना दिलं, ज्यांनी पात्रता नाही, त्यांनाही आपण मोठं केलं. पण उद्धवसाहेबांची तब्येत बरी नसताना गद्दारांनी बंडखोरी केली. ठाकरे कुटुंब विधिमंडळात आले हीच यांची सर्वांत मोठी अडचण ठरली, असा थेट बाण आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर सोडून जाहीरपणे ठाकरे कुटुंबाच्या विधिमंडळ एन्ट्रीवर शिवसेना नेत्यांची कशी नाराजी होती, हेच सांगितलं आहे.

कालपासून आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर कडाडून हल्ला चढवला. मी गद्दारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देणार नाही. कारण गद्दारांना प्रश्न विचारायचा अधिकार आणि त्यांची तेवढी लायकीही नसते, अशा घणाघाती शब्दांत आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवार प्रहार केला. तुम्ही गद्दार नसतात तर मी तुमच्या आरोपांना, प्रश्नांना उत्तरं दिली असती. शिवसैनिकांनी प्रश्न विचारले तर मी त्याला उत्तर दिलं असतं. तुम्ही पहिले गद्दारी का केली, याचं उत्तर द्या, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना खडसावले.

Click to listen highlighted text!