Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraElectionUpdate : राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Spread the love

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला हिरवा कंदील दाखवताच राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आगामी काळात होणाऱ्या १३ महापालिका निवडणुकांसाठी आता पुन्हा आरक्षण सोडत निघणार आहे. तसे, आदेश निवडणूक आयोगाने या १३ महापालिकांना दिल्या आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाने याआधी काढलेली आरक्षण सोडत रद्द होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशानुसार आता नवी आरक्षण सोडत निघणार आहे. याचा फायदा ओबीसी समाजाला होण्याची शक्यता आहे. मात्र ३१ मे रोजी काढलेल्या आरक्षण सोडतीमधील अनुसुचित जाती जमातींचे आरक्षण तसेच रहाणार आहे. पण, सर्वसाधारण महिलांचे आणि सर्वसाधारण प्रवर्गात काढण्यात आलेली यादी रद्द बातल ठरवण्यात आली आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण सुरक्षित करून नवीन आरक्षण सोडत २९ जुलै रोजी काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!