Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : ईडीच्या छापेमारीत सापडले २० कोटीचे घबाड

Spread the love

कोलकता : सक्तवसुली संचलनालयाने पश्चिम बंगालमधील एसएससी घोटाळा प्रकरणात ईडीने टाकलेल्या छाप्यात तब्बल २० कोटी रुपये हाती लागल्याचे वृत्त आहे. ईडीने या जप्त केलेल्या नोटांचा फोटो ईडीने ट्विट केला आहे. पश्चिम बंगाल स्कूल सर्व्हिस कमिशन आणि बंगाल प्राथमिक शिक्षण बोर्ड भरती घोटाळ्याचा तपास करण्यासाठी टाकण्यात आलेल्या छाप्यांची माहिती ईडीने  ट्विट करून दिली आहे.

पश्चिम बंगालमधील कथित शिक्षक भरती घोटाळ्याच्या तपासासाठी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील दोन मंत्री पार्थ चॅटर्जी आणि परेश अधिकारी यांच्या घरावर छापेमारी केली. या कारवाईनुसार ईडीचे सात ते आठ अधिकारी सकाळी साधारण ८ वाजता चॅटर्जी यांच्या घरी पोहोचले. आणि ११ वाजेपर्यंत छापेमारी केली. यादरम्यान केंद्रीय रिजर्व पोलीस दलाचे (CRPF) कर्मचारी बाहेर तैनात करण्यात आले होते.

दरम्यान , एजन्सीच्या अधिकाऱ्यांची दुसरी एक टीम कूचबिहार जिल्ह्यातील मेखलीगंजमधील अधिकाऱ्यांच्या घरी पोहोचली आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी शहरातील जादवपूर भागातील पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षा बोर्डाचे माजी अध्यक्ष माणिक भट्टाचार्य यांच्या घरावर छापेमारी केली. सीबीआयने उच्च न्यायालयाच्या निर्देशावर पश्चिम बंगाल स्कूल सेवा आयोगाच्या शिफारसीवर सरकारद्वारा प्रायोजित आणि सहाय्यता प्राप्त शाळांमध्ये समूह सी आणि डी कर्मचारी आणि शिक्षकांची भरती झाली. कथित अनियमिततांचा तपास केला जात आहे. तर ईडी या प्रकरणात संबंधित कथित मनी लॉन्ड्रींगचा तपास करीत आहे.

छापेमारीबद्दल माहिती नाही : परेश अधिकारी

जेव्हा कथित घोटाळा झाला तेव्हा काबिल चॅटर्जी त्या वेळी शिक्षण मंत्री होते. आता उद्योग आणि वाणिज्य मंत्री पदावर आहेत. सीबीआयने दोन वेळा त्यांची चौकशी केली आहे. पहिल्यांदा २५ एप्रिल रोजी तर दुसऱ्यांदा १८ मे रोजी चौकशी करण्यात आली होती. या छापेमारीबद्दल माहिती नसल्याचं अधिकारी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!