Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PresidentLatestNewsUpdate : द्रौपदी मुर्मू झाल्या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती

Spread the love

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे. मुर्मू यांनी विरोधकांचे उमेदवार असलेल्या यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. द्रौपदी मुर्मू यांना ८१२ मते  तर यशवंत सिन्हा यांना ५२१ मते  मिळाली आहेत. या विजयामुळे मुर्मू यांना प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा बहूमान मिळाला आहे. 

https://twitter.com/ANI/status/1550149393990373376

द्रौपदी मुर्मू २४ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतील. देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपुष्टात येत आहे.

या निवडणुकीसाठी ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता. देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान पार पडले होते. राष्ट्रपतीपदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच मुर्मू आघाडीवर होत्या. तिसऱ्या फेरीपर्यंत मुर्मू यांना वैध मतांपैकी ५० टक्के मते मिळाली.

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच मुर्मू यांनी आघाडी घेतली होती ती अखेरच्या म्हणजेच तिसऱ्या टप्प्यापर्यंत कायम राखली. पहिल्या टप्प्यात मुर्मू यांना ५४० मते  मिळाली होती. या मताचे मूल्य ३,७८,००० इतके होते. तर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना २०८ मते  मिळाली होती. त्यांच्या मतांचं मूल्य १,४५,००० इतके  होते . दुसऱ्या फेरीत मुर्मू यांना १३४९ मते  मिळाली तर यशवंत सिन्हा यांना ५३७ मते  मिळाली. तिसऱ्या फेरीत विजयावर शिक्कामोर्तब करत मुर्मू यांची विजयाची आघाडी एकूण ८१२ मतांपर्यंत पोहोचली. तर यशवंत सिन्हा यांना ५२१ मते  पडली. तिन्ही फेरीत एकूण मिळून द्रौपदी मुर्मू यांना २१६१ मते  मिळाली तर यशवंत सिन्हा यांना १०५८ मते  मिळाली.

१७ खासदारांची मते फुटली

दरम्यान राष्ट्रपतीपदाच्या या निवडणुकीत देशभरातील एकूण १७ खासदारांची मते  फुटली आहेत. या खासदारांनी एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान केला. परिणामी मुर्मू शेवटपर्यंत आघाडीवर राहिल्या आणि त्यांचा विजय झाला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. अधिकाधिक पाठिंबा मिळावा म्हणून मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांनी देशभर दौरे केले होते. मात्र या निवडणुकीमध्ये मुर्मू यांचा विजय झाला.

मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीत कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, ओदिशा आणि पंजाब या राज्यातील लोकप्रतिनिधींनी दिलेल्या मतांची मोजणी करण्यात आली. या फेरीत एकूण १३३३ मते वैध ठरली. यातील ८१२ मते मुर्मू यांना तर ५२१ मते सिन्हा यांना मिळाली. मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीपर्यंत ३२१९ मते वैध ठरली. या मतांचे मूल्य ८,३८,८३९ एवढे ठरले. तिसऱ्या फेरीपर्यंतच्या वैध मतापैंकी मुर्मू यांना २१६१ मते मिळाली, ज्याचे मूल्य ५,७७,७७७ एवढे आहे. तर सिन्हा यांना १०५८ मते मिळाली. या मतांचे मूल्य २६१०५२ एवढे आहे. म्हणजेच तिसऱ्या फेरीपर्यंत वैध मतांपैकी ५० टक्क्यांपेक्षाही जास्त मते मुर्मू यांना मिळाली.

पंतप्रधानांकडून अभिनंदन …

यशवंत सिंह यांच्याकडून अभिनंदन

आपलं सरकार

Click to listen highlighted text!