Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HaryanaNewsUpdate : धक्कादायक : खाण माफियांनी डीएसपीला चिरडले …

Spread the love

चंदीगड : हरियाणातील नुह जिल्ह्यात खाण माफियांशी संबंधित लोकांनी डीएसपीला अक्षरशः चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत डीएसपी सुरेंद्र सिंह विश्नोई यांचा जागीच मृत्यू झाला आहे. डीएसपी सुरेंद्र स्वतः खाणकाम थांबवण्यासाठी घटनास्थळी गेले होते. त्यांनी अवैध दगडाने भरलेला ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला असता डंपर चालकाने त्यांच्या जिप्सीला धडक देत डंपर पुढे नेला तेंव्हा त्यांचे वाहन डंपरच्या पुढे नेऊन डीएसपी सुरेंद्र डंपरच्या पुढे उभे राहिले तेंव्हा मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्यांना डंपरने चिरडले आणि आरोपी घटनास्थळी न थांबता पसार झाले.

डीएसपी सुरेंद्र सिंह हे हिसार जिल्ह्यातील आदमपूर भागातील सारंगपूर गावचे रहिवासी होते. १२ एप्रिल १९९४ रोजी ते हरियाणा पोलिसात एएसआय पदावर दाखल झाले. ते ३१ ऑक्टोबर रोजी पोलिसातून निवृत्त होणार होते.

हे वृत्त समजताच नुहचे एसपी आणि आयजी घटनास्थळी उपस्थित तत्काळ उपस्थित झाले आणि माहिती घेतली. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू आहे. ही घटना गुरुग्रामला लागून असलेल्या नूह जिल्ह्यातील तवाडू पोलीस स्टेशन हद्दीतील पाचगाव गावातील आहे. डीएसपी सुरेंद्र सिंह बिश्नोई यांना गावाशेजारील अरवली टेकडीवर बेकायदेशीर खाण सुरू असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर ते मंगळवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या टीमसह पोहोचले.

डीएसपीचा जागीच मृत्यू झाला…

दरम्यान पोलीस पथकाला पाहताच त्यांचा चालक व खाणकामात गुंतलेले लोक डोंगराजवळ उभा असलेला डंपर घेऊन पळू लागले तेंव्हा  डीएसपी गाडी थांबवण्यासाठी पुढे आले असता डंपर चालकाने त्यांना धडक दिली आणि पळून गेला. टायरखाली आल्याने डीएसपीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एसपी वरुण सिंगला घटनास्थळी पोहोचले.

या प्रकरणाबाबत हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी सांगितले की, ज्या वेळी डीएसपी विश्नोई यांचा मृत्यू झाला त्यावेळी संपूर्ण पोलिस दल त्यांच्यासोबत होते. छापा टाकण्यासाठी ते घटनास्थळी गेले होते. राज्याचे डीजीपीही नूह येथे  पोहोचणार असून ते संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत.आम्ही कुणालाही सोडणार नाही,आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. मृत डीएसपीच्या कुटुंबीयांना सरकार ५० लाख रुपये देणार आहे.

सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असून आजूबाजूच्या परिसरात चालकाचा शोध सुरू आहे. मारेकरी लवकरच पकडले जातील आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन हरियाणा पोलिसांनी ट्विटमध्ये दिले आहे.

एडीजी कायदा आणि सुव्यवस्था म्हणाले…

हरियाणाचे ADG कायदा आणि सुव्यवस्था संदीप खिरवार म्हणाले, “आम्हाला दुपारी 12 च्या सुमारास माहिती मिळाली. याप्रकरणी आम्ही कठोर कारवाई करू. हरियाणा पोलिसांचे पथक आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्नशील आहे. जनतेमध्ये कायद्याबद्दलचा विश्वास वाढेल. दोषींवर कडक कारवाई केली जाईल. बेकायदा उत्खननाविरोधात आमची कारवाई सुरू होती. त्याचबरोबर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हत्येवेळी घटनास्थळी खाण माफियांच्या कार्यकर्त्यांची संख्या सुमारे पाच ते सहा असल्याचे सांगण्यात येत आहे.

रणदीप सुरजेवाला यांचे वक्तव्य

डीएसपी सुरेंद्र सिंह विश्नोई यांच्या हत्येप्रकरणी रणदीप सुरजेवाला यांचे वक्तव्य समोर आले आहे. सुरजेवाला म्हणाले- ‘हरियाणा खाण माफियांचा अड्डा, सरकार आणि खाण माफियांचा संगनमत, डीएसपीच्या हत्येची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी’.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!