Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

EDNewsUpdate : अखेर ईडीकडून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक

Spread the love

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे.  संजय पांडे यांची ईडीकडून चौकशी सुरू असून ईडीने त्यांना आज दिल्लीमध्ये अटक केली आहे. एनएसई फोन टॅपिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्णन या सह लोकेशन प्रकरणात मुख्य आरोपी आहेत.

संजय पांडे ३० जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन निवृत्त झाले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांच्या आत त्यांना ईडीने नोटीस पाठवली होती. निवृत्तीनंतर अटक होणारे संजय पांडे हे तिसरे मुंबई पोलीस आयुक्त आहेत. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने यापूर्वीच त्याची चौकशी केली आहे. यापूर्वी फोन टॅपिंग प्रकरणात सीबीआय मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा शोध घेत होती. तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी संजय पांडे यांच्या घराचीही झडती घेतली होती. ईडीच्या तपासात असे समोर आले की, लोकेशन प्रकरण एनएसईच्या निदर्शनास आल्यानंतर २०१७ मध्ये संजय पांडे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांचे फोन टॅपिंग बंद करण्यात आले होते. जोगेश्वरी कार्यालयात एकूण १२० कॉल इंटरसेप्शन सुविधा आहे. प्रत्येक ४ लँडलाइन फोनवरून एकावेळी ३० पर्यंत कॉल्स रोखले जाऊ शकतात. या लँडलाईन NSE मध्ये होत्या.

काय आहे प्रकरण ?

संजय पांडे यांच्या कंपनीने जवळपास आठ वर्षे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची माहिती सीबीआयला (CBI) मिळाली आहे. संजय पांडे यांच्या ISEC सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने रेड सर्व्हर नावाच्या उपकरणांचा वापर करून हे फोन टॅप केल्याचा आरोप सीबीआय आणि ईडीने केला आहे.

संजय पांडे ज्यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक होते तेव्हा त्यांनी परमबीर सिंह यांना अनिल देशमुख यांच्याविरोधात माघार घेण्यासाठी दबाव निर्माण केला असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच NSE सर्व्हर कॉप्रमाईज केस प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. चित्र रामकृष्णा प्रकरणात एक ऑडिट कंपनी तयार करण्यात आली होती, ही कंपनी संजय पांडे यांची होती. या प्रकरणात बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. संजय पांडे यांनी २००१ मध्ये आयटी ऑडिट फर्म सुरू केली होती. त्यानंतर जेव्हा त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही तेव्हा ते पुन्हा पोलीस सेवेत आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला आणि आईला फर्ममध्ये संचालक केले. २०१० आणि २०१५ च्या दरम्यान Isec Services Pvt Ltd नावाच्या फर्मला NSE सर्व्हर आणि सिस्टम्सचे IT ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. सीबीआय आणि ईडीने त्यांच्या फर्मची चौकशी सुरू केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!