Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadLatestNewsUpdate : मोठी बातमी : औरंगाबादच्या नामांतराची “हि” अपडेट तुम्हाला माहित आहे काय ?

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या प्रस्तावाला राज्य सरकराने मंजुरी दिली असली तरी या निर्णयाला अंतिम मंजुरी केंद्र सरकारकडून मिळणे बाकी आहे. राज्य सरकार आपला प्रस्ताव आता केंद्राकडे पाठवेल त्यांनतर कायदेशीर सर्व विभागांच्या परवानगी घेऊन केंद्र सरकार अंतिम मंजुरी देईल.अर्थात या कायदेशीर कारवाईसाठी आणखी किती वेळ लागेल हे सांगणे कठीण असले तरी गुगलवर मात्र हा निर्णय येण्याआधीच औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर झाले आहे. 

राज्याचे मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाता जाता शेवटच्या कॅबिनेट मध्ये  २९ जून २०२२ रोजी औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असे केले होते. श्रेयवादाच्या लढाईत मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच शिंदे फडणवीस सरकारकारने तडकाफडकी ठाकरे सरकारच्या नामांतराच्या निर्णयाला तत्काळ स्थगिती दिली होती. आणि लगेच १६ जुलै २०२२ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावाला पुन्हा एकदा मंजुरी दिली.

तुम्ही इंटरनेटवर औरंगाबाद असे नाव सर्च इंजिन आणि गुगल मॅपवर टाकताच तुम्हाला औरंगाबादचे नाव ” संभाजीनगर झाल्याचे दिसेल.  १६ जुलै रोजी विकिपीडियातील माहितीत बदल केल्याची नोंद दिसत आहे. विकिपीडियाच्या उस्मानाबादच्या पेजवर मात्र अद्याप नावात कोणताही बदल केलेला दिसत नसला तरी गुगल मॅपवर मात्र आता तुम्हाला औरंगाबादचा उल्लेख संभाजी नगर ( छत्रपती संभाजी नगर नव्हे ) तर उस्मानाबादचा उल्लेख “धाराशिव ” असा केल्याचे दिसत आहेत. विशेष म्हणजे औरंगाबादचा कोणताही पत्ता शोधताना तुम्हाला मोहल्ल्याबरोबर पुढे औरंगाबादच्या ऐवजी संभाजीनगर असे दिसेल.

उस्मानाबादही झाले धाराशीव…

आपल्या माहितीसाठी …

1988: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा  औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभेत संभाजीनगर नामकरण करण्याची घोषणा केली.
1995 जूनमध्ये औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ नामांतर करण्याचा ठराव मनपाच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर
1995 राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार असल्यामुळे नामकरणाची अधिसूचना काढण्यात आली.
1996 मध्ये मुश्ताक अहेमद यांनी औरंगाबादच्या नामकरणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
1999 मध्ये राज्यात सत्तांतर होऊन युतीचे सरकार गेले. त्यामुळे नामकरणाचा प्रस्ताव पुढे सरकला नाही.
2002 मध्ये मुश्ताक अहेमद यांनी न्यायालयात दाखल केलेली याचिका निकाली निघाली.
2020 मार्चमध्ये औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणबाबतची न्यायालय याचिका, एनओसीबाबत शासनाने प्रशासनाकडून माहिती मागविली.
2021 मध्ये ‘सुपर संभाजीनगर’ असा नारा देत शहरात डिस्पले लागले.
2022 जूनमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नामकरणाचा मुद्दा मार्गी लावण्याबाबत जाहीर सभेत वक्तव्य केले.
29 जून 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा निर्णय घेतला.
14 जुलै 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाने महाविकास आघाडी सरकारने केलेल नामांतराचा ठराव रद्द केला.
16 जुलै 2022 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावाला पुन्हा एकदा मंजुरी दिली.

16 जुलै 2022 रोजीच गुगल मॅप आणि विकिपीडियावर दोन्हीही शहराचे नामांतर करण्यात आले.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!